शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:10 IST

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी तमाम अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी ठाणेदारांना दिले आहेत.

ठळक मुद्देमहानिरीक्षकांचे ठाणेदारांना आदेश : वरली, मटका, जुगार, दारूबंदच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी तमाम अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी ठाणेदारांना दिले आहेत.सोमवारपासून जिल्हा पोलीस प्रशासनाचे महानिरीक्षकांकडून वार्षिक निरीक्षण सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी श्रीकांत तरवडे यांनी गुन्हे आढावा बैठक घेतली. त्यात वाढती गुन्हेगारी, गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यात येणारे अपयश, डिटेक्शनचे घटलेले प्रमाण, गुन्हे शाबिती व शिक्षेच्या प्रमाणात झालेली घट, त्यासाठी कारणीभूत ठरत असलेले सदोष दोषारोपपत्र, क्रियाशील गुन्हेगारांवरील प्रतिबंधात्मक कारवाई, आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी अशा विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. सहायक फौजदाराच्या खुनातील आरोपी २१ दिवसानंतर का होईना गजाआड झाल्याबाबत बैठकीत समाधानही व्यक्त करण्यात आले.गृहराज्यमंत्र्यांना अवैध धंदे बंद हवे आहेत, त्यांच्या आदेशाचे पालन व्हावे, जिल्ह्यात कुठेही अवैध प्रवासी वाहतूक, मटका, जुगार, क्रिकेट सट्टा, क्लब, कोंबडबाजार, अवैध दारू, अंमली पदार्थांची तस्करी, प्रतिबंधित गुटखा विक्री, शस्त्र विक्री या सारखे अवैध धंदे चालविले जाऊ नये, असे कुठे आढळल्यास संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे महानिरीक्षकांनी बैठकीत ठाणेदारांना बजावले. गृहराज्यमंत्र्यांनी हे धंदे सुरू आहेत की नाही, हे तपासण्याची जबाबदारी महानिरीक्षकांवर सोपविली होती. ते प्रत्यक्ष तपासणी करतात का याकडे नजरा लागल्या आहेत.परेड निरीक्षण आणि मुलाखतीप्रभारी पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी सोमवारी पळसवाडी कॅम्प स्थित पोलीस ग्राऊंडवर जिल्हाभरातील ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांच्या परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी ऐकून घेतल्या. पुढील पाच दिवस जिल्ह्याच्या विविध भागात महानिरीक्षकांचे हे वार्षिक निरीक्षण चालणार आहे. त्यात तीन पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये आणि विविध शाखांचा समावेश आहे.