शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

एसपी ‘चेंज’च्या चर्चेला अखेर विराम

By admin | Updated: June 9, 2016 02:05 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेला बुधवारी अखेर पूर्णविराम मिळाला.

 यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चेला बुधवारी अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यात सिंह यांचे नाव नसल्याने त्यांच्या निकटवर्तीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर त्यांची बदली होणारच अशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. अखिलेशकुमार सिंह सुमारे वर्षभरापूर्वी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. सुरुवातीला त्यांनी स्वत: मटका-जुगार अड्ड्यांवर जाऊन धाड मारण्यापर्यंतची धडक कामगिरी केली. परंतु नंतर या कामगिरीत शिथिलता आली. त्यातच तत्कालीन घाटंजी ठाणेदाराचे प्रकरण गाजले. त्यामुळे सत्ताधारी नेते मंडळीची नाराजी झाल्याचे सांगत एसपींच्या बदलीच्या चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाल्या होत्या. पहिल्या यादीत नाव नव्हते त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव असणारच असे बोलले जात होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्यांच्या समक्ष पोलीस बंदोबस्ताची दाणादाण उडाल्याने आणि सीएम नाराज झाल्याने आता बदली होणारच असे मानले जात होते. परंतु बुधवारी जारी झालेल्या यादीने एसपींच्या बदलीबाबत छातीठोकपणे सांगणाऱ्यांचा फुगा फोडला. त्यामुळे अखिलेशकुमार सिंह हेच किमान पुढील वर्षभर जिल्हा पोलीस दलाची धुरा सांभाळणार हे स्पष्ट आहे. (जिल्हा प्रतिनिधी) महानिरीक्षकांच्या बदलीकडे नजरा४अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांची पुणे अथवा मुंबईत बदली निश्चित मानली जात आहे. त्यांच्या जागेवर कोण येणार याची चर्चा आहे. सध्या तरी सीआयडीच्या पुणे मुख्यालयातील अजित पाटील व विठ्ठल जाधव या अधिकाऱ्यांची नावे टॉपवर आहेत. मात्र पाटील यांना महानिरीक्षकपदी बढती मिळाली तरच अमरावतीत संधी मिळू शकते.