शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

दाभा येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती

By admin | Updated: September 26, 2016 02:42 IST

सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दाभा(पहूर) येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती उत्साहात झाली.

एकात्मतेचे प्रतीक : विविध कार्यक्रमांची रेलचेल, भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग, युवकांचे लोटांगणदाभा(पहूर) : सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दाभा(पहूर) येथील चाळीस दिवसांच्या दिंडीची समाप्ती उत्साहात झाली. ८९ वर्षांपासून ही दिंडी काढली जात आहे. बग्गी जावराचे श्री संत रामजी महाराज यांनी महामारीच्या काळात १९२७ साली आषाढ कृष्ण बारस या दिवसापासून ४० दिवसांची दिंडी सुरू करायला लावली. संत रामजी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे यादवराव परोपटे यांनी एकट्याने ही दिंडी सुरू केली. आज ही दिंडी संपूर्ण गावाची दिंडी आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दिंडी निघाली. यात पालखी, वारकरी, भजन मंडळ, श्री गुरुदेव सेवा मंडळ, शंकरराव शेंडे व रंजन ठवकर यांची अवधुती भजन मंडळाची मांड, भोलेनाथ भजन मंडळ, आदिवासी भजन मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, श्री संत मोहन महाराज महिला भजनी मंडळ आदी मंडळांचा समावेश होता. दिंडीसोबत योगेश फाळे, अवधुत ठवकर, अंकुश मुडे, रोशन वनवे, मंगेश सडसडे, अमोल बानते, संदीप बानते, सागर राऊत, युवराज भडके, मंगेश शेंडे, सुमित डायरे, आकाश गावंडे, सुनील बानते, अरविंद पंचबुद्धे, गोपाल भडके, अक्षय बानते, संतोष पोयाम, फकिरा वानखेडे, सागर पंचबुद्धे हे उघड्या अंगाने हात जोडून लोटांगण गेले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत मोहन महाराज मंदिर, राम मंदिर, संत बळीराम महाराज मठ, हनुमान मंदिर, संत मोहन महाराज तपोभूमी मंदिराच्या पायऱ्या लोटांगणाने चढले व उतरले. गावातील काही चौकात गजर व भारूडाच्या तालावर गोफ विणून उकलले. निखिल मेहत्रे, वृषभ अंजीकर, प्रवीण गांजरे, गोलू फाळे, सुरज बोकाडे, निखिल बाहुटे, कपिल घावडे, निखिल परोपटे, माधव अंजीकर, प्रमोद फाळे, सुनील अंजीकर, शालिग्राम कानतोडे, श्रावण परोपटे, आकाश लोखंडे आदी सहभागी झाले होते. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनीही दिंडीला भेट दिली. माजी मंत्री वसंत पुरके दिंडीत सहभागी झाले होते. या मान्यवरांचा मानाचे शेले, नारळ देऊन सन्मान करण्यात आला. दिंडीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचल्यावर पारंपरिक आरत्या झाल्या. हभप गणेश महाराज येलकर यांच्या हस्ते काला वाटपानंतर दिंडीची समाप्ती झाली. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पदाधिकारी व ट्रस्टींनी भजन मंडळ आणि साधूसंतांचा मानाचे शेले व नारळ देऊन सन्मान केला. (वार्ताहर)