शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

अतिक्रमणधारकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 8, 2017 00:23 IST

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन विभागाच्या पथकासमोर

सावंगी येथील घटना : काही काळ तणाव, वन विभागाच्या पथकासमोरच घेतले विष वणी : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन विभागाच्या पथकासमोर एका अतिक्रमणधारकाने विष प्राशन केले. मंगळवारी दुपारी वणी तालुक्यातील सावंगी (नवीन) येथे घडलेल्या या घटनेने वन विभाग हादरून गेला आहे. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, विष प्राशनामुळे प्रकृती गंभीर झाल्याने सदर अतिक्रमणधारक शेतकऱ्याला वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. शंकर वामन नक्षिणे (४२) असे विष प्राशन करणाऱ्या अतिक्रमणधारक शेतकऱ्याचे नाव आहे. शंकर नक्षिणेसह सावंगी (नवीन) गावातील अन्य चारजणांनी वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले होते. त्यावर पिकाचे उत्पादन घेऊन हे अतिक्रमणधारक कुटुंबाची गुजरान करीत आहेत. शंकर नक्षिणे याने सन २००२-०३ मध्ये चार एकर वन जमिनीवर अतिक्रमण केले होते. १३ डिसेंबर २००५ पूर्वीचे वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करण्याबाबतचा अधिनियम शासनाने २००६ मध्ये काढला होता. मात्र तरीही शंकर नक्षिणे याचे अतिक्रमण कायम करण्यात आले नव्हते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती भाकपचे अनिल घाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. असे असतानाही वन विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत नक्षिणेसह अन्य अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली. ठरल्यानुसार मंगळवारी सकाळी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक आर.के.पटवारी हे ५० जणांच्या फौजफाट्यासह सावंगी येथे वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोहचले. तेथे पोलीस कर्मचाऱ्यांसह महसूल कर्मचारीदेखील उपस्थित होते. अतिक्रमण काढण्यासाठी सात जेसीबी मशीन आणण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होताच, शंकर नक्षिणे व अन्य अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शविला. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, असे या अतिक्रमणधारकांनी वनअधिकाऱ्यांना टाहो फोडून सांगितले. मात्र वन अधिकाऱ्यांनी त्यांचे न ऐकता कारवाई आरंभली. त्यामुळे उद्वीग्न झालेल्या शंकरने वन अधिकाऱ्यांसमोर विष प्राशन केले. ही घटना घडत असताना कोणताही अधिकारी शंकरला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी पुढे आला नाही. शंकरची प्रकृती गंभीर बनताच, त्याला वणी येथे आणण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)