शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

‘सीओं’च्या अधिकारावर एसडीओंचे अतिक्रमण !

By admin | Updated: February 9, 2016 02:08 IST

स्थानिक शासकीय विश्रामगृहातील अवैध वृक्षतोड प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकारावर उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचा प्रकार पुढे आला.

७२ वृक्षांची तोड : भाजपा कार्यकर्त्याला सव्वातीन लाखांचा ‘रिलीफ’ वणी : स्थानिक शासकीय विश्रामगृहातील अवैध वृक्षतोड प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकारावर उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचा प्रकार पुढे आला. दंड म्हणून प्रतिवृक्ष पाच हजार रूपये ठोठावणे बंधनकारक असताना केवळ ५०० रूपये दंड ठोठावून सव्वातीन लाखांची ‘बचत’ करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या येथील विश्रामगृहातील तब्बल ३० वर्षे जुन्या साग, कडूनिंब, बांबू, शिरस, करंजी आदी ७२ वृक्षांची अवैधरित्या तोड करण्यात आली. बाग-बगीच्याचे निर्माण हे कारण त्यासाठी पुढे केले गेले. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तक्रार नोंदविल्यानंतर चौकशी सुरू झाली. विजय पिदूरकर या भाजपाच्या कार्यकर्त्याने लोकसहभागातून बाग बनविण्याचा संकल्प केला. त्यातून ही वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी संबंधितास प्रती वृक्ष ५०० रूपये प्रमाणे दंड ठोठावला. परंतु प्रत्यक्षात हा अधिकारच एसडीओंना नसल्याची गंभीर बाब आता पुढे आली आहे. सूत्रानुसार, महाराष्ट्र वृक्षतोड (नागरी क्षेत्र) अधिनियम १९७५ अन्वये महानगर पालिका, नगर पालिका क्षेत्रातील वृक्षतोडीसाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. वणीच्या शासकीय विश्रामगृहातील वृक्षतोड ही नगर परिषद हद्दीत समाविष्ट आहे. त्यामुळे कारवाईचे अधिकार नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना आहे. मात्र एसडीओंनी कार्यक्षेत्र नसताना तातडीने प्रती वृक्ष केवळ ५०० रूपये दंड करून प्रकरण नस्तीबद्ध का केले, ही बाब गुलदस्त्यात आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील एसडीओंचा हा हस्तक्षेप अनेकांना कोड्यात टाकणारा आहे. नियमानुसार ७२ वृक्षांच्या तोड प्रकरणी प्रती वृक्ष पाच हजार रूपये दंड ठोठावणे बंधनकारक आहे. मात्र पाच हजाराऐवजी केवळ ५०० रूपये दंड ठोठावून भाजपाच्या त्या कार्यकर्त्याला एसडीओंनी ‘रिलीफ’ दिला. त्यांच्याकडून तीन लाख २४ हजार रूपये दंड कमी वसूल करण्यात आला. यातून शासनाचे नुकसान झाले. एसडीओंनी अधिकारात नसताना प्रकरण स्वत:कडे घेणे, केवळ ५०० रूपये दंड ठोठावणे, याबाबी राजकीय इशाऱ्यावर तर झाल्या नाही ना, अशी शंका राजकीय गोटात व्यक्त केली जाऊ लागली आहे. अधिकार क्षेत्राबाहेरील बाब असताना चुकीचे अधिकार वापरून प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करणे, हा फौजदारीच्या कक्षेत येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या अवैध वृक्षतोड प्रकरणात देड करण्याचा नेमका अधिकार कुणाचा, याबाबत नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अशोर गराटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा भ्रमध्वनी सतत बंद येत होता. त्यांच्या क्रमांकापर्यंत पोहोचू शकत नाही, असे सांगण्यात येत होते. (कार्यालय प्रतिनिधी)राजकीय इशाऱ्यावरून तडजोडीची शंका जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी लक्ष घातल्यास दंडाच्या रकमेतील सव्वातीन लाखांच्या ‘रिलीफ’चे रहस्य उघड होण्यास वेळ लागणार नाही.एरव्ही एसडीओ कार्यालयाकडे अनेक प्रकरणे प्रलंबित असतात, त्यासाठी एवढी तत्परता कधी दाखविली जात नाही, मात्र या वृक्षतोडीत ती दिसली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना आहे. मी कायद्याचेच पालन केले. कायद्यानुसारच कारवाई केली. त्याविरूद्ध अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल दाखल करता येऊ शकते.- संदीपकुमार अपार, उपविभागीय महसूल अधिकारी, वणी