शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील जत्रा मैदानावर अतिक्रमणाचा सपाटा सुरू

By admin | Updated: November 3, 2014 23:33 IST

वणी शहरात दरवर्षी गुढी पाडव्यापासून जवळपास ३५ दिवस चालणारी जत्रा भरते. या जत्रेसाठी खास ३५ एकरांचे मैदान उपलब्ध आहे. मात्र आता नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे या मैदानावर अतिक्रमणाचा

वणी : वणी शहरात दरवर्षी गुढी पाडव्यापासून जवळपास ३५ दिवस चालणारी जत्रा भरते. या जत्रेसाठी खास ३५ एकरांचे मैदान उपलब्ध आहे. मात्र आता नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे या मैदानावर अतिक्रमणाचा सपाटा सुरू असल्याने भविष्यात हे मैदानच नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे.नगरपरिषदेजवळ तब्बल ३५ एकरांचे भव्य यात्रा मैदान आहे़ या मैदानावर दरवर्षी रंगनाथ स्वामींच्या नावाने जत्रा भरते़ यावेळी भरणारा बैलबाजार विदर्भात ख्यातीप्राप्त आहे़ या मैदानावर आता अतिक्रमणाचा सपाटा सुरू असल्याने हे मैदान दिवसेंदिवस छोटे होत आहे. येत्या काही वर्षांत जत्रेसाठी मैदान शिल्लक राहील की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे रंगनाथ स्वामी जत्रेपासून नगरपरिषदेला चांगले उत्पन्नही मिळते. याच जत्रा मैदानावर दरवर्षी दसरा महोत्सव होतो़ आता या मैदानाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे़ या मैदानाच्या ऐन मध्यभागी हनुमान मंदिर बांधले गेले आहे. त्यासाठी मैदानाची बरीच जागा व्यापली गेली आहे़ या मंदिरात सभा मंडप, स्वयंपाकगृहाची व्यवस्था आहे. परिणामी मंदिर समिती हे सभागृह मंगल कार्यासाठी किरायाने देऊन उत्पन्न प्राप्त करीत आहे. तथापि त्या जागेचा कर मात्र नगरपरिषद भरते. विशेष म्हणजे नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता, या परिसरात दारू दुकाने, बीअर बार, सिनेमा टॉकिज, आरामशीन थाटण्यात आली आहे. वणीची जत्रा जवळपास महिनाभर सुरू राहाते. रंगपंचमीपर्यंत ही जत्रा सुरू राहाते. या जत्रेला पूर्वी खूप गर्दी होत होती. आता मात्र मनोरंजनाची साधने घरीच उपलब्ध झाल्याने अनेकांनी जत्रेकडे पाठ फिरविली आहे. त्यातच जत्रेत नेहमी येणारे संगीत कलापथक बंद झाल्यानेही जत्रेवर अवकळा आली आहे. तरीही परिसरातील अनेक नागरिक या जत्रेला दरवर्षी हजेरी लावत असतात. शहरातील नागरिकही विरंगुळा म्हणून जत्रेला भेट देत असतात. आता मात्र तेथे योग्य सुविधा मिळत नसल्याने अनेक जण जत्रेत जाण्याचे टाळतात.जत्रेसाठी ३५ एकरांचे मैदान असूनही जत्रेत सुटसुटीत जागा नसते. दाटीवाटीने दुकाने लागलेली असतात. तेथे सतत धूळही उडत असते. साधे पाणी मारण्याची तसदी कुणी घेत नाही. धुळीमुळे वातावरणात प्रदूषण होते. नागरिकांच्या शरीरात धुळीचे कण जाऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो. विस्तीर्ण मैदान असूनही त्याची योग्य देखभाल होत नसल्याने हे परिस्थिती ओढवली आहे. हे मैदान दिवसेंदिवस छोटे होत असल्याने भविष्यात तर तेथे खरच जत्रा भरणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)