शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घरकूल

By admin | Updated: March 17, 2017 02:40 IST

शहरातील सुमारे १२०० अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकूल मिळणार आहे. त्यादृष्टीने नगरपरिषदेने पावले उचलली आहेत.

१२०० घरे : नागपूर रोडवरील डम्पिंगच्या दहा एकर जागेवर उभारणार तीन मजली वास्तू, नंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात यवतमाळ : शहरातील सुमारे १२०० अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकूल मिळणार आहे. त्यादृष्टीने नगरपरिषदेने पावले उचलली आहेत. शहरातून बाहेर जाणाऱ्या काही मुख्य मार्गालगत अनेकांनी अतिक्रमण करून घरे उभारली. दारव्हा रोड, कॉटन मार्केट, शासकीय रूग्णालय आदी परिसरात असे अनेक अतिक्रमणधारक आहेत. शहरातील यासह इतर परिसराचे नगरपरिषदेतर्फे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यातून सुमारे १२०० कुटुंबांना पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत हक्काचे घरकुल देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जागा निश्चितीही झाली आहे. आता केवळ प्रत्यक्षात बांधकाम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. या घरकुलांसाठी नागपूर बायपासलगतची डंपींग ग्राउंडची १० एकर जागा निश्चित करण्यात आली. तेथे सुमारे १२०० घरकुल उभारण्यात येणार आहे. जी-२ टाईपमध्ये हे बांधकाम होणार आहे. तळमजला धरून तीन मजल्यांची वास्तू तेथे उभारण्यात येणार आहे. त्यात या १२०० कुटुंबांना प्रत्येकी ३२५ चौरस फुटांचे हक्काचे घरकुल मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यांना अगदी मोफत त्याचा लाभ घेता येणार आहे. येत्या काही दिवसांतच या बांधकामाला सुरूवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यानंतरच्या टप्प्यात आणखी काही घरकुले बांधली जाणार आहे. त्यासाठी नगरपरिषदेने वडगाव व पिंपळगाव परिसरातील प्रत्येकी दोन, तर लोहारा, मोहा आणि भोसा परिसरातील प्रत्येकी एका जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. या सर्व जागा शासकीय मालकीच्या असून ई क्लास जमिनी आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेची मोजणी करून देण्याबाबत भूमिअभिलेख विभागाला पत्रही दिल्याची माहिती आहे. त्यानंतर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. (शहर प्रतिनिधी)