शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दत्त चौक रोड परिसराला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

दहा मीटर रुंदीचा हा मार्ग प्रत्यक्षात पाच मीटरही वाहनधारकांना वापरायला मिळत नाही. एक तर दुकानांचे साहित्य रस्त्यावर आले, त्यापुढे ग्राहकांंचे पार्किंग, त्यापुढे हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अशी रस्त्याच्या दुतर्फा अवस्था आहे. त्यामुळे तेथून वाहन काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. शहराचे हृदयस्थळ असल्याने तेथे सतत गर्दी पहायला मिळते. अतिक्रमण हे या गर्दीचे प्रमुख कारणे मानले जाते.  

ठळक मुद्देनगरपालिकेचे दुर्लक्ष : दुकानांचे साहित्य रस्त्यावर, वाहन पार्किंग वांद्यात, फेरीवाल्यांची गर्दी

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेने दोन कोटी रुपये खर्चून बांधकाम केलेल्या नेताजी चौक ते संतसेना चौक, पुढे दत्त मंदिर - बसस्थानक पर्यंतच्या सुमारे एक किलोमीटरच्या मार्गावर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. दहा मीटर रुंदीचा हा मार्ग प्रत्यक्षात पाच मीटरही वाहनधारकांना वापरायला मिळत नाही. एक तर दुकानांचे साहित्य रस्त्यावर आले, त्यापुढे ग्राहकांंचे पार्किंग, त्यापुढे हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अशी रस्त्याच्या दुतर्फा अवस्था आहे. त्यामुळे तेथून वाहन काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. शहराचे हृदयस्थळ असल्याने तेथे सतत गर्दी पहायला मिळते. अतिक्रमण हे या गर्दीचे प्रमुख कारणे मानले जाते.  यवतमाळ शहरात आर्णी रोड, पांढरकवडा रोड, दारव्हा रोड, धामणगाव रोड अशा सर्वच प्रमुख मार्गांवर अतिक्रमणाची ही समस्या आहे. त्यातही हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण सर्वाधिक आहे. वाहतूक पोलीस तैनात असूनही या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहराचे आरोग्य बिघडले. 

हातगाड्यांचे सर्वाधिक अतिक्रमण नेताजी चौक ते संत सेना चौक अर्थात दत्त मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर फळे, भाजीपाला विकणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. आधीच व्यावसायिक दुकानाबाहेर, त्याच्या पुढे हातगाड्या अशी अवस्था पहायला मिळते. 

वाहन चालक वाहतूक पोलिसांच्या निशाण्यावर

 दत्त चौक परिसरात वाहनांच्या पार्किंगला जागाच नाही. त्यात तेथे वाहतूक पोलीस तैनात असतात. अशा वेळी दुकानासमोर वाहन पार्क केल्यास ते रस्त्यावर आले असे म्हणून वाहनचालकांना पोलिसांकडून दंडाचे चलान दिले जाते. 

 यवतमाळ शहरात प्रमुख मार्गांवर कुठेच पार्किंगची अधिकृत व्यवस्था नाही. नव्याने बांधलेल्या आर्णी रोडवर तर आणखीच अडचण आहे. फुटपाथच्या बाहेर रस्त्यावर पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. 

अतिक्रमण हटाव मोहीम ६ डिसेंबरपूर्वी राबविली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना मदत मागण्यात आली आहे. तक्रारी आलेले अतिक्रमण प्राधान्याने उठविले जाणार आहे. कुठे अतिक्रमण असेल तर नागरिकांनी तक्रारी कराव्या. शहरातील सर्व रस्त्यांवरचे वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविले जाणार आहे. दुकानांचे अतिक्रमण असेल तर व्यावसायिकांना त्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. - राहुल पळसकरअतिक्रमण विरोधी पथक प्रमुख 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण