मुळावा : उमरखेड तालुक्यातील तिवरंग येथे भारूडी भजनांचा सामना आयोजित करण्यात आला होता. येथे गणेश मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागामध्ये अजूनही अशा प्रकारचे भजनी सामने घेतले जातात आणि ते लोकप्रिय होतात. उमरखेड तालुक्यातील पिंपरी दिवट आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मरगडा येथील भजनी दिंड्यांचा सामना रंगतदार झाला. चटकदार दोपारे, शेर यांच्यासोबत भक्तिगीत, गौळण सादर करण्यात आली. पिंपरी दिवट येथील अशोक सूर्यवंशी आणि संचांनी मच्छिंद्रनाथाची कथा वर्णन केली, तर वरगडा येथील परशुराम काळे व त्यांच्या संचाने गंधर्वाची (गाढवाचं लग्न) कथा वर्णन केली. तालुक्यातील तिवडी, टाकळी, पळशी, भाटेगाव, इहळगाव, सुकळी, कळमुला, पोफाळी, जनुना येथील गावकरी उपस्थित होते. हा सामना दोन दिवस चालला. समारोपीय कार्यक्रम माजी सरपंच दिनेश चौतमाल यांच्या उपस्थितीत झाला. (वार्ताहर)
तिवरंग येथे भारूडी भजनांचा सामना
By admin | Updated: September 15, 2016 01:23 IST