शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ऊर्समुळे अनेकांना रोजगार

By admin | Updated: February 10, 2016 03:10 IST

बाबा कंबलपोष यांच्या उर्समुळे अनेकांना रोजगार मिळाला. आर्णीतील या यात्रेमध्ये जवळपास ७०० लहान-मोठ्या दुकानांची गर्दी झाली आहे.

बाबा कंबलपोष यात्रा : ७०० दुकानांची गर्दीहरिओम बघेल आर्णीबाबा कंबलपोष यांच्या उर्समुळे अनेकांना रोजगार मिळाला. आर्णीतील या यात्रेमध्ये जवळपास ७०० लहान-मोठ्या दुकानांची गर्दी झाली आहे. या दुकानदारांनी यात्रा कमिटीकडे रितसर नोंद केली आहे. विशेष म्हणजे यात्रेव्यतिरिक्त शहरातील इतर दुकानदारांनाही यात्रेकरूंच्या गर्दीमुळे जादा फायदा होत आहे. यात्रा परिसरात ७०० दुकानदारांनी कमिटीकडे नोंद करून विविध दुकाने थाटली आहे. यात पाळणा व इतर मनोरंजनाचीही साधने आहेत. या सर्व दुकानांमध्ये काम करणाऱ्यांचा विचार केला तर यात्रा परिसरात तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यांच्यासह शहरातील बिछायत केंद्र, किराणा दुकान, हॉटेल आदी व्यवसायांमध्येही मोठ्या प्रमाणात आवक-जावक वाढली आहे. बाबा कंबलपोष यात्रेसाठी बाहेरगावावरून मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येत आहेत. त्यामुळे आर्णीतील उलाढाल वाढली आहे. अनेक छोट्या व्यावसायिकांना या गर्दीमुळे मोठा आधार मिळत आहे. वर्षभर संघर्ष करणाऱ्या दुकानदारांना यात्रेमुळे चांगल्या व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे. सोबतच दर्गा परिसरात लंगर सुरू असल्यामुळे अनेकांच्या जेवणाचीही काळजी मिटली आहे. बाहेरगावातून आलेल्या व्यावसायिकांना लंगरमुळे जेवणाचा खर्च करण्याचीही गरज उरलेली नाही. बाबा कंबलपोष यांच्या सामाजिक एकोप्यासोबतच यात्रेमुळे आर्णीच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठी भर पडल्याचे व्यावसायिकच सांगत आहे. बाबा कंबलपोष यांचाच हा आशीर्वाद असावा, असेही भाविकांमधून बोलले जात आहे. बाबा कंबलपोष यात्रेमुळे अनेकांना रोजी-रोटीचा मोठा आधार मिळतो. यात्रा परिसरासह शहरातील दुकानांचाही व्यवसाय वाढतो. मागील अनेक वर्षांपासून हाच अनुभव येत आहे. उर्समुळे सामाजिक वातावरणही चांगले राहते. हिंदू-मुस्लीम एकता निर्माण करणारी ही यात्रा आहे. - कांतिलाल कोठारीअध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स