शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे हलचल रजिस्टरच गायब

By admin | Updated: August 4, 2016 00:58 IST

जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातून हलचल रजिस्टरच गायब झाले आहे. बुधवारी काही विभागात या रजिस्टरबाबत विचारणा केली असता,

जिल्हा परिषद : शासकीय वेळेत कर्मचारी राहतात खासगी कामात व्यस्त यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातून हलचल रजिस्टरच गायब झाले आहे. बुधवारी काही विभागात या रजिस्टरबाबत विचारणा केली असता, ते नेमके कुठे ठेवले आहे, याबाबत बहुतांश कर्मचारी अनभिज्ञ आढळले. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेचा थेट जनतेशी संबंध येतो. शासनाच्या विविध योजना याच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात येतात. जनतेचे प्रतिनिधी याच सभागृहात निवडून येतात. ते आपल्या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपयोग करतात. त्यातून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होतो. तथापि सध्या अनेक योजना थेट ग्रापंचायतीमार्फत राबविण्यात येत असल्याने अलिकडे या संस्थेचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. जिल्हा परिषदेचा पसारा खूप मोठा आहे. विविध विभाग आहेत. या विभागांमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना शासन निर्णयानुसार विविध सुट्या आणि हक्काच्या रजाही मिळतात. ही सुविधा असूनही अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेतही आपले वैयक्तीक काम उरकताना दिसतात. रजा न घेता ते अनेकदा कार्यालयातून गायब होतात. जिल्ह्यातून आलेल्या ग्रामस्थांनी त्या विभागात विचारणा केली असता, त्यांना संबंधित कर्मचारी अमुक बैठकीला गेले, तमुक ठिकाणी कामानिमित्त गेले, साहेबांकडे गेले, दौऱ्यावर गेले, अशी उत्तरे दिली जातात. वास्तविक कार्यालयातून बाहेर पडताना कर्मचाऱ्याला हलचल रजिस्टरवर तो नेमका कोणत्या कामासाठी कुठे जात आहे, याचे लेखी विवरण लिहिणे आवश्यक असते. मात्र बहुतांश विभागात हलचल रजिस्टर कुठे ठेवले आहे, हेच त्यांना माहिती नाही. माहित असले, तरी त्यावर नोंद करणे त्यांच्या सोयीचे नसते. त्यामुळे कुणीही कधीच या रजिस्टरला विचारत नाही. त्यामुळे त्या विभागातील कर्मचारी नेमका कुठे गेला, हे विभाग प्रमुखालाही अनेकदा माहिती नसते. (शहर प्रतिनिधी)