शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नेर नगरपरिषदेमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा

By admin | Updated: June 25, 2017 00:09 IST

नगरपरिषदेत निर्माण झालेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा शहर विकासात अडथळा ठरत आहे.

केवळ तिघांवर काम : १५ कर्मचाऱ्यांची एकाचवेळी बदली लोकमत न्यूज नेटवर्क नेर : नगरपरिषदेत निर्माण झालेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा शहर विकासात अडथळा ठरत आहे. केवळ तीन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर या पालिकेचा कारभार सुरू आहे. कार्यरत असलेल्या १८ पैकी १५ कर्मचाऱ्यांची बदली झाली. यात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. १ जून रोजी या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मात्र रिक्त जागांवर नवीन कर्मचारी पाठविण्यात आलेला नाही. शहरातील ४५ हजार नागरिकांचा थेट संबंध नगरपरिषदेशी येतो. शहर स्वच्छतेसह सांडपाण्याच्या नाल्या, पिण्याचे पाणी आदी बाबींची पूर्तता नगरपरिषदेकडून केली जाते. शहराचा व्याप पाहता आधीच तुटवडा असताना बदली सत्र राबविण्यात आले. एका-एका कर्मचाऱ्याकडे दोन-दोन टेबलचा प्रभार होता. आता या टेबलवरील सर्व कामे ठप्प पडली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता, पर्यवेक्षक स्थापत्य अभियंता, नगर अभियंता (विद्युत), लेखा परिक्षक, लेखापाल, कार्यालय निरीक्षक, कर निरीक्षक, सहायक निरीक्षक, मिळकत पर्यवेक्षक, सहायक विधी व कामगार पर्यवेक्षक, सहायक अग्निशमन पर्यवेक्षक, नगर रचनाकार, सहायक समाज कल्याण अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आदी पदे एकाचवेळी रिक्त झाली आहेत. त्यामुळे तीन कर्मचाऱ्यांवर कारभार सुरू आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी धीरजकुमार गोहाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.