बोटोणी : येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत़ त्यामुळेच काही कर्मचाऱ्यांना येणे-जाणे करावे लागत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकास व्हावा, या उद्देशाने आदिवासी विकास विभांतर्गत सन १९७२ मध्ये येथे आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आश्रमशाळा सुरू करण्या आली. त्यावेळी शाळा इमारतीसह कर्मचाऱ्यांसाठी माती व विटाच्या जुडाईने बांधलेली व कवेलूंची छप्परे असलेली निवासस्थानेही बांधण्यात आली. आता मात्र या निवासस्थानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे़ भिंतीला तडे गेले आहे़ पावसाळ्यात या निवासस्थानांमध्ये प्रचंड ओलावा असतो. अनेक निवासस्थानांना दरवाजे, खिडक्या नाहीत, काही दरवाजे, खिडक्या मोडकळीस आल्या आहे. या निवासस्थानांमधील शौचालयाच्या टाक्या नादुरूस्त आहेत़ त्यामुळे कर्मचाऱ्यांना शौचास बाहेर उघड्यावरच जावे लागत आहे़ आता येथे अकरावी व बारावीचे वर्ग आहे. त्यात ३८१ विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात़ त्यांच्यासाठी ३५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे़ मात्र मुख्याध्यापिका, अधीक्षक, अधीक्षीका व मोजकेच कर्मचारी मुख्यालयी राहतात़ काहींनी गावात भाडे तत्त्वावर वास्तव्य सुरू केले आहे. निवास्थानांअभावी अनेक कर्मचारी बाहेरगावावरून येणे-जाणे करीत आहेत. अद्ययावत निवासस्थानांच्या मागणीसाठी प्रकल्प कार्यालयांतर्गत शालेय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी एका निवासस्थानाचे उन्हाळ्यात छप्पर उडाले, ते निवासस्थान अजूनही त्याच स्थितीत आहे़ परंतु बांधकाम विभागाकडून कोणतीही दखल घेतली नाही़ (वार्ताहर)
कर्मचाऱ्यांचे निवासस्थान जीर्ण, वास्तव्य कठीण
By admin | Updated: October 4, 2014 23:34 IST