शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी सोशल मीडियावर व्यस्त

By admin | Updated: December 28, 2015 02:35 IST

शासकीय सेवा गतिमान करण्यासाठी सर्व कार्यालयांना इंटरनेटने जोडण्यात आले.

बहुतेक शासकीय कार्यालयातील प्रकार : कार्यालयीन वरिष्ठांचे दुर्लक्षवर्धा : शासकीय सेवा गतिमान करण्यासाठी सर्व कार्यालयांना इंटरनेटने जोडण्यात आले. सेवा आॅनलाईन झाल्याने शासकीय कार्यालयांमध्ये इंटरनेटची सुविधा मिळाली आहे. नागरिकांची कामे लवकर व्हावी हा शुद्ध हेतू शासनाचा आहे. पण या सुविधांच्या आड बहुतेक कार्यालयातील कर्मचारी सोशल मीडियावरच व्यस्त आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये फेरफटका मारता असता हे सत्य समोर येते. डिजीटल इंडियाचा नारा भारताने दिला आहे. पूर्वी सर्व शासकीय कामे ही आॅफलाईन असायची. त्यामुळे कामे संथगतीने व्हायची. पण या काही वर्षात ही कामे गतिमान करण्यासाठी जिल्हास्तरावरील सर्व शासकीय कार्यालये ही संगणकीकृत करण्यात आली आहे. कामे आॅनलाईन पद्धतीने होत असल्याने कार्यालयांमध्ये इंटरनेटचे जाळे तयार करण्यात आले. यामुळे कामे गतिमान होऊन ती सोपी झाली. नवी पिढी ही तंत्रज्ञान कौशल्य लगेच आत्मसाद करणारी असल्याने कामाचा वेग वाढला आहे. शासकीय पदभरतीत त्यामुळेच संगणक कौशल्य ही अटही प्रामुख्याने घालण्यात आली आहे. पण याच काही वर्षात सोशल मीडियाची नवनवी माध्यमे उदयास आली आहे. यामध्ये फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप आदी माध्यमांचा बोलबाला आहे. युुवा पिढीसह वयोवृद्ध मंडळीही या माध्यमांपासून दूर राहिलेली नाही. ही माध्यमे वापरण्यावर कुणाचेही बंधन नाही. परंतु कार्यालयात कामासाठी मिळालेल्या संगणकाचा व इंटरनेट सुविधेचा फेसबूक सर्फिंगसाठी वापर या काही दिवसांमध्ये वाढला आहे. अनेक कार्यालयामध्ये कागदोपत्री व्यवहार हे ई-मेलच्या माध्यमातून होतात. त्यामुळे ती सुविधा वापरणे अनिवार्य आहेत. पण या सोबत वेळात वेळ काढून किंवा कामाच्या वेळातही कामे बाजूला ठेवून संगणकावर फेसबूक सर्फिंग करणारी अनेक मंडळी शासकीय कार्यालयांमध्ये फेरफटका मारला असता दिसून येते. यामध्ये तरूण युवक युवतींचा जास्त सहभाग आहे. याचा विपरित परिणाम कामावर होत आहे. अनेक जण कार्यालयात आल्याबरोबर तास दोन तास फेसबूकवर रममाण झालेले असतात. किंवा इतर काम करतानाही सोबत सोबत कुणी चोरून लपून तर कोणी बिनधास्तपणे सोशल नेटवर्किंग करीत असतात. त्यामुळे कार्यालयांमध्ये अश्या सोशल नेटवर्किंग साईट बॅन असणे गरजेचे आहे. वारिष्ठांनी लक्ष देत कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.(शहर प्रतिनिधी)