शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

जिल्ह्यातील कर्मचारी संपात, शासकीय कार्यालये ओस

By admin | Updated: September 3, 2015 02:03 IST

केंद्र व राज्य सरकारच्या कामगार आणि कर्मचारी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.

देशव्यापी संप : ५० विविध संघटनांचा सहभाग, कामकाज ठप्पयवतमाळ : केंद्र व राज्य सरकारच्या कामगार आणि कर्मचारी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसत होता. जिल्ह्यातील विविध ५० संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले होते. त्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. जिल्हा मुख्यालयी शासकीय कामानिमित्ताने आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना संपामुळे कामाविनाच परत जावे लागले. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ केला. हा मोर्चा शहरातील विविध मार्गाने जाऊन पुन्हा जिल्हा कचेरीवर धडकला. त्यावेळी एलआयसी चौकात या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. कर्मचारी नेत्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवावे, कामगार कायद्यातील कामगार हिताची कलमे काढू नये, रेल्वे व संरक्षण सेवांचे खासगीकरण करू नये, कंत्राटी कामगार भरती बंद करून कायमस्वरूपी कर्मचारी नेमावे, अंशदायी पेन्शन योजना बंद करून सरसकट सर्वांनाच जुनी पेन्शन लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. या आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे निमंत्रक रवींद्र देशमुख, पेन्शनर्स असोसिएशनचे गोपाळकृष्ण देशपांडे, मंगेश वैद्य, नंदू बुटे, जिल्हा ग्राहक सेवा संघटनेचे विजय देशमुख, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे पी.पी. घाडगे, विजय ठाकरे, ग्रामसेवक संघटनेचे एस.के. जाधव, एम.डी. मस्के, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर काठोळे यांनी केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.या देशव्यापी संपात राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे बँकांचे कामकाजही ठप्प झाले होते. संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चात महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला. विविध फलक हातात घेतलेले कर्मचारी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. (शहर वार्ताहर)