शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

दिग्रस नगर परिषदेत पाच कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 05:00 IST

१६ ऑगस्ट २०१७ राेजी दिग्रस शहरात हरितपट्टा तयार करण्यासाठी दोन हजार झाडे लावण्याचा निर्णय नगर परिषद सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. १५ ऑक्टोबर २०१८ ही झाडे लावून पुढील वर्षभर त्याची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले. मात्र, कंत्राटदाराने अवघी १०० - २०० झाडे लावून ५३ लाख रुपयांचे बिल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काम अपूर्ण असताना मुख्याधिकारी, कंत्राटदार व कनिष्ठ अभियंत्याच्या संगनमताने ते देयक निघाल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देसेना नगरसेवकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : दारव्हा मुख्याधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिग्रस नगर परिषदेच्या विकासकामांमध्ये सुमारे पाच कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक (प्रभाग क्र. ४) कैलास जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अभियंता, कंत्राटदार, मुख्याधिकारी यांच्यासह ११ जणांविरुद्ध ही तक्रार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या तक्रारीची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी २९ एप्रिल रोजी दारव्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांच्याकडे सोपविली. २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल या तक्रारीमध्ये गैरअर्जदार म्हणून दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी, दिग्रसचे सार्वजनिक बांधकाम उपअभियंता, कान्होबा कंस्ट्रक्शनचे संचालक, दिग्रसमधील चार कंत्राटदार, लातूर येथील श्रीनाथ इंजिनिअर्स, नागपूरच्या ग्रीन रेन्बोचे संचालक, दिग्रस नगर परिषदेचे कनिष्ठ अभियंता, दिग्रस येथील सार्वजनिक बांधकामचे कनिष्ठ अभियंता यांना गैरअर्जदार म्हणून नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या निधीचा अपव्यय, कामावर देखरेख न ठेवणे, भ्रष्टाचाराला पाठबळ व सहभाग आदी ठपका गैरअर्जदारांवर तक्रारीत ठेवण्यात आला आहे. १६ ऑगस्ट २०१७ राेजी दिग्रस शहरात हरितपट्टा तयार करण्यासाठी दोन हजार झाडे लावण्याचा निर्णय नगर परिषद सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. १५ ऑक्टोबर २०१८ ही झाडे लावून पुढील वर्षभर त्याची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले. मात्र, कंत्राटदाराने अवघी १०० - २०० झाडे लावून ५३ लाख रुपयांचे बिल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काम अपूर्ण असताना मुख्याधिकारी, कंत्राटदार व कनिष्ठ अभियंत्याच्या संगनमताने ते देयक निघाल्याचे म्हटले आहे. २०१८ मध्ये सर्वसाधारण सभेने धुर्वेनगर ते गौरक्षणपर्यंत जॉगिंग ट्रॅक, इंटरलिंकिंग, बेंचेस, २७० डेरेदार वृक्ष याकरिता दोन कोटी २४ लाख चार हजारांच्या निधीची तरतूद केली. कान्होबा कन्स्ट्रक्शनला हे काम दिले गेले. मात्र प्रत्यक्ष काम झाले नसताना केवळ कागदोपत्री दाखवून दोन कोटी २४ लाख चार हजारांची उचल करून गंभीर गुन्हा केल्याचे म्हटले आहे. विशेष असे जॉगिंग ट्रॅक अस्तितत्वातच नसताना १२ जुलै २०१९ ला त्याचे कागदोपत्री हस्तांतरण दाखवून श्रीक्षेत्र घंटीबाबा जॉगिंग ट्रॅक असे नामकरणही करण्यात आले. हा भ्रष्टाचाराचा कळस असल्याचे नगरसेवक कैलास जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल तक्रारीत नमूद केले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी चाैकशी अहवाल मागितलादिग्रस नगर परिषदेतील भ्रष्टाचार, अनियमितता, अपहार व आर्थिक अनियमिततेची सखोल चौकशी करून संबंधित गैरअर्जदारांवर कारवाई करावी, दिग्रस नगर परिषद बरखास्त करावी, अशी मागणी नगरसेवक कैलास जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञा लेखाद्वारे दाखल केलेल्या निवेदनातून केली आहे. या तक्रारीची दखल घेत दारव्हा मुख्याधिकाऱ्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची मुद्देनिहाय चौकशी सोपविण्यात आली आहे. या चौकशीचा स्वयंस्पष्ट अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी २९ एप्रिल रोजी दिले आहेत. 

कंत्राट दोन हजार वृक्षांचा, लावले केवळ २००; तरीही ५३ लाखांची उचल२३ मार्च २०१७ रोजी नगर परिषदेने ठराव घेऊन शहरातील विविध भागात उद्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महेशनगर उद्यानासाठी ४४ लाख १९ हजार, विष्णू कमलनगर ३७ लाख सहा हजार, केशवनगर ४८ लाख ५५ हजार, गिरीराज पार्क ४४ लाख १८ हजार, साईकृपानगर ४१ लाख ३९ हजार, बापूनगर ४९ लाख ९२ हजार तर आकाशनगरमधील उद्यानासाठी १० लाख ६७ हजारांच्या निधीची तरतूद करून कामाचे आदेश जारी करण्यात आले होते. सहा महिन्यांत ही कामे पूर्णत्वास नेणे बंधनकारक होते. मात्र, त्यात प्रचंड अनियमितता झाली. प्रत्यक्ष कामे न करता परस्पर निधीची उचल केली गेली. दिग्रस नगर परिषदेत या माध्यमातून संगनमताने सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजी