शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; एकास सक्त मजुरीची शिक्षा

By विशाल सोनटक्के | Updated: March 17, 2023 18:10 IST

न्यायालयाचा निकाल : २०१६ मधील राळेगाव येथील प्रकरण 

यवतमाळ : घरगुती विद्युत बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या पथकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी राळेगाव येथील एकास सहा महिने सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ यांनी सुनावली. 

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ राळेगाव विभागाचे कनिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश गोविंद भुलगावकर हे पथकासह घरगुती विद्युत बिलाची थकबाकी वसुली करण्यासाठी राळेगाव शहरातील ओमनगर येथे गेले होते. यावेळी त्रिपदवार यांचे वीज मीटर काढत असताना शेजारी राहणारा प्रेमानंद शेषराव आटे हा तेथे आला. विद्युत मीटर काढायचे नाही, तसेच थकबाकीही द्यायची नाही असे म्हणून त्याने कनिष्ठ तंत्रज्ञ भूलगावकर यांची कॉलर पकडून दूर ढकलले.

यावेळी पथकातील दुसरा सहकारी आटे यास अडविण्यासाठी गेला असता त्याच्या सोबतही धक्काबुक्की केली. आटे याने घरात जाऊन स्वत:ला जखमी करून घेतले व तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवेन अशी पथकातील सदस्यांना धमकी दिली. २२ मार्च २०१६ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी राळेगाव पोलिस ठाण्यात कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण चौके यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले

हे प्रकरण तदर्थ जिल्हा न्यायाधीश - २ श्रीमती एस. आर. शर्मा यांच्यासमोर चालले. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी प्रेमानंद आटे यास भादंविचे कलम ३५३ अंतर्गत सहा महिने सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा ठोठावली, तर भादंविचे कलम ३३२ अंतर्गत सहा महिने सक्त कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अनिलकुमार एस. वर्मा यांनी काम पाहिले. त्यांना राळेगाव ठाण्याचे पैरवी अधिकारी राजेश भाऊराव पानसे यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Courtन्यायालयYavatmalयवतमाळ