शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेच्या कामासाठी चक्क वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:14 IST

‘अमृत’ योजनेतून होत असलेल्या कामांसाठी विजेची चोरी केली जात आहे. टाकीच्या बांधकामासाठी तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या टाकीचे बांधकाम : भरवस्तीत तारांवर आकोडे, महावितरण मेहेरबान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘अमृत’ योजनेतून होत असलेल्या कामांसाठी विजेची चोरी केली जात आहे. टाकीच्या बांधकामासाठी तारांवर आकोडे टाकून वीज घेण्यात येत आहे. लोहारा येथे दिवसाढवळ्या सुरू असलेला प्रकार पुढे आला आहे. आणखी किती ठिकाणी अशाच प्रकारे वीज चोरी होत आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान विद्युत कंपनीपुढे आहे.बेंबळाचे पाणी आणून यवतमाळ शहराला २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. ३०२ कोटींच्या ‘अमृत’ योजनेतून यासाठीची तयारी सुरू आहे. शहराच्या विविध भागात नवीन पाईपलाईन टाकली जात आहे. पाच ते सोळा लाख लिटरपर्यंतच्या टाक्या उभ्या केल्या जात आहे. मात्र या कामांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून घेण्यात आलेल्या नाही. बांधकामासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असलेले पाणी घेण्यासाठीच्या सोयी नाममात्र आहे. यातूनच वीज चोरीसारखे प्रकार होत आहे.लोहारा मार्गावर असलेल्या वसंत गृहनिर्माण सोसायटी परिसरातील अंगणवाडी केंद्रामागे पाण्याची टाकी बांधली जात आहे. याच ठिकाणी मोठी विहीर आहे. त्यातील पाणी या कामासाठी घेण्यात येत आहे. तीन-चार दिवसांपासून काँक्रिटच्या कामाला हात लागला आहे. या कामांसाठी तारावर आकोडे टाकून वीज वापरली जात आहे. या भागात वस्ती आहे. नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. तरीही आकोडे टाकून वीज वापरण्यात येत आहे. टाकीचे बांधकाम बरेच महिने चालणार आहे. त्यासाठी पाणी आवश्यक आहे. काम पूर्ण होईपर्यंत चोरीचीच वीज वापरली जाईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सर्वच ठिकाणी बोंबाबोंबयोजनेच्या कामासाठी पाणी आवश्यक आहे, हे माहीत असतानाही कंत्राटदार कंपनीने कुठेही विजेचे मीटर घेतलेले नाही. खुद्द विद्युत कंपनीची ही माहिती आहे. पाणी टँकरने आणले तरी वर चढविण्यासाठी दाब आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची गरज नाही. शहरात आठ ते नऊ टाक्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी कंपनीने काय उपाययोजना केल्या, याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. शासकीय योजनेच्या कामासाठी वीज चोरीचा प्रकार अयोग्य आहे.अजय बेले, प्रभारी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, यवतमाळ