शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीतच वीज चोरी

By admin | Updated: April 26, 2017 00:08 IST

येथील पळसवाडी कॅम्पमध्ये पोलीस वसाहती आहे. या इमारतींमध्ये सर्रास वीज चोरी केली जात असल्याने खुद्द अपर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी

अपर अधीक्षकांनी बजावली नोटीस : क्वॉर्टर ३०० अन् मीटर शंभरच ! सुरेंद्र राऊत यवतमाळ येथील पळसवाडी कॅम्पमध्ये पोलीस वसाहती आहे. या इमारतींमध्ये सर्रास वीज चोरी केली जात असल्याने खुद्द अपर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये वीज चोरीऐवजी वीज पुरवठा नियमित करून घ्यावा, असा शब्दच्छल करण्यात आला. पोलीस वसाहतीत हा प्रकार चालत असल्याने वीज कंपनीचे स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे. पळसवाडी कॅम्प परिसरात बिल्डींग क्रमांक एकमध्ये ३६ क्वॉर्टर असून केवळ पाच वीज मीटर आहेत. बिल्डींग क्रमांक दोन आणि तिनचीसुद्धा अशीच स्थिती आहे. यात जवळपास ३०० अन् मीटर मात्र शंभरच आहे. जुन्या क्वॉर्टरमध्ये थेट वीज जोडण्या घेण्यात आल्या आहेत. पोलीस वसाहतीत चक्क वीज चोरीचा प्रकार सुरू असल्याची बाब वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अपर जिल्हा पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना वीज देयकाचा वेळेत भरणा करणे आणि वीज पुरवठा नियमित करून घेण्याची सूचना केली. याबाबत गुरूवारी नोटीस बजावण्यात आली. मात्र त्याउपरही कर्मचाऱ्यांकडून अधिकृत वीज जोडणीबाबत प्रतिसाद मिळाला नाही. शिस्तीच्या खात्यातील कर्मचाऱ्यांकडून नियमाचे उल्लघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. वीज वितरणची यंत्रणा हा प्रकार राजरोसपणे बघत आहे. एरव्ही बिल भरण्यास काही दिवसांचा विलंब झाल्यास थेट पुरवठा तोडण्याची कारवाई करणारे महावितरण प्रशासन येथे मात्र मूग गिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात देयक न भरल्यास त्वरित वीज पुरवठा खंडित करतात. गरिबांना अंधारात राहावे लागते. येथे मात्र पोलीस चोरीच्या उजेडात राहतात. मीटर रूम नव्हे, मौत का कुआ पोलीस वसाहतीत वीज पुरवठा करणारे सर्व मीटर एकाच खोलीत बसविण्यात आले आहे. येथील स्थिती अतिशय बिकट आहे. जीवंत विद्युत तारा उघड्या असून त्यावरूनच थेट जोडणी आहे. मीटर रूमचा दरवाजाही उघडणे धोकादायक आहे. जुन्या बिल्डींगच्या मीटर रुमला दार नसल्याने तेथे डुकरांनी आश्रय घेतला आहे. येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.