शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांब, मीटरचे पैसे परत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:12 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीज खांब, वीज तारा आणि मीटरसाठी भरलेली रक्कम ग्राहकांना परत मिळणार आहे.

ठळक मुद्देवीज ग्राहक संघटना : शेतकरी, घरगुती व औद्यागिक वीज ग्राहकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीज खांब, वीज तारा आणि मीटरसाठी भरलेली रक्कम ग्राहकांना परत मिळणार आहे. ८ सप्टेंबर २००६ नंतरच्या शेतकरी, घरगुती आणि लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांना याचा फायदा होणार असल्याची माहिती वीज ग्राहक संघटनेने दिली आहे.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ‘आकरांची अनुसूची’ जाहीर आणि लागू केल्यापासून लघुदाब व उच्चदाब ग्राहकांकडून सर्वीस लाईन व मीटरचे शुल्क घेण्याचा महावितरणचा हक्क संपला आहे. तरीही बेकायदेशीररित्या यासाठी रक्कम वसूल केली गेली. यासंदर्भात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने याचिका दाखल केली. बेकायदेशीररित्या आकारलेल्या रकमा परत करण्याचे आदेश १७ मे २००८ रोजी नियामक आयोगाने दिले. महावितरण कंपनी अपिलात गेल्याने न्यायालयाने परतावा करण्यास मनाई केली होती. या दाव्याचा अंतिम निकाल देताना १० नोव्हेंबर २०१६ च्या आदेशान्वये सर्वोच्च न्यायालयाने महावितरणचे अपिल फेटाळले. त्यामुळे आता २००६ नंतरच्या वीज ग्राहकांना भरलेली अथवा खर्च केलेली रक्कम सव्याज मिळणार असल्याचे सांगण्यात आले.नमुना अर्ज आणि अधिक माहितीसाठी वीज ग्राहक संघटना कार्यालय, गोधणी रोड यवतमाळ येथे संपर्क करावा, असे विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी म्हटले आहे.आर्थिक स्थिती खालावल्याने चार्जेसमहावितरणची म्हणजे पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची आर्थिक स्थिती खालावू लागल्याने मंडळाने १९९० मध्ये सर्वीस लाईन चार्जेस निश्चित करून आकारणी सुरू केली. वीज जोडणी देण्यासाठी लागणाºया पायाभूत सुविधांसाठीचा (पोल्स, लाईन आदी) खर्च निश्चित केला. आकारांची अनुसूची निश्चित करताना सर्व ग्राहकांवरील हा आकार पूर्णपणे रद्द केला. त्याचबरोबर मीटर कंपनीने स्वखर्चाने लावायचे, कोणत्याही ग्राहकाकडून मीटरची किंमत घेता येणार नाही, असेही आदेश दिले. तरीही अनेक ग्राहकांवर हा भुर्दंड बसविण्यात आला होता. आता ही रक्कम संबंधित ग्राहकांना परत मिळणार असल्याचे प्रशांत दर्यापूरकर यांनी सांगितले.