शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून शेकडो पोपट ठार

By admin | Updated: September 17, 2015 02:59 IST

अचानक आलेल्या वादळासोबत एक वीज झाडावर कोसळ्याने शेकडो पोपटांचा बळी गेल्याची घटना शहरानजीक मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

मुकुटबन येथील घटना : अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे झाली निकामी मुकुटबन : अचानक आलेल्या वादळासोबत एक वीज झाडावर कोसळ्याने शेकडो पोपटांचा बळी गेल्याची घटना शहरानजीक मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी मृत पोपटांचा सडा पाहून प्रत्येक जण हळहळत होता. मंगळवारी रात्री विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. सोबतच जोरदार पावसाला सुरूवात झाली. शहराच्या मध्यभागी श्रीसंत नागन्ना महाराज यांचा मठ आहे. या मठाच्या बाजूला एक भले मोठे पिंपळाचे झाड आहे. या झाडावर दररोज सायंकाळी अनेक पक्षी बसतात. त्यांची किलबिलाट दररोज नागरिकांच्या कानी पडते. सायंकाळी तर पक्ष्यांचा गोंगाट सुरू असतो. मंगळवारी जोराची हवा असल्याने इतर पक्ष दुसरीकडे निघून गेले असावे. मात्र पोपटांचा एक थवा त्या पिंपळ वृक्षावर बसला होता.अशातच त्यावेळी वादळ-वारा व मेघगर्जनेसह पाऊस कोसळू लागला. त्यातच विजांचा कडकडाट सुरूच होता. त्यातीलच लखलखणारी एक वीज त्या पिंपळ वृक्षावर कोसळली. पिंपळावर बसलेल्या ‘राघू-मैने’सह इतरही पोपटांना त्याचा जोरदार झटका बसला अन् क्षणार्धात झाडावरील सर्व पोपट पटापट खाली कोसळून मृत्युमुखी पडले. तडफडत त्यांनी आपले प्राण त्यागले. हे दृश्य बघून अनेक नागरिकांचे डोळेही पाणावले होते.झाडावर वीज कोसळताच शेजारील घरांमधील कुलर, दूरचित्रवाणी संच, फ्रिजलासुद्धा हानी पोहोचली. अनेक विद्युत उपकरणे निकामी झाले. मात्र सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने बुधवारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सर्व मृत पोपटांना जमा करून करून त्यांना दफन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)