शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

८८ कोटींचे विद्युत कंत्राट पुण्याला

By admin | Updated: December 18, 2014 23:01 IST

वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांंच्या उभारणीसाठी यवतमाळ जिल्ह्याकरिता ८८ कोटी रुपयांचे कंत्राट पुण्याच्या कंपनीला देण्यात आले आहे. दरम्यान या कंपनीने येथील एका हॉटेलमध्ये या संंबंधीची बैठक

पायाभूत सुविधा : पॉश हॉटेलमध्ये बैठक, वीज अभियंते उपस्थित, वितरणची सारवासारव यवतमाळ : वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांंच्या उभारणीसाठी यवतमाळ जिल्ह्याकरिता ८८ कोटी रुपयांचे कंत्राट पुण्याच्या कंपनीला देण्यात आले आहे. दरम्यान या कंपनीने येथील एका हॉटेलमध्ये या संंबंधीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वीज अभियंत्यांनीही शासनाचे नियम धुडकावून हजेरी लावल्याने सलोख्याचे संबंध उघड होत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सहा हजार कोटी रुपयांची इन्फ्रा-२ ही योजना जाहीर करण्यात आली. तत्कालीन ऊर्जा मंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला. सदर योजनेतून यवतमाळ जिल्ह्याला सुमारे ८८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून जिल्ह्यात विजेसाठी पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. त्यातून वीज वाहिन्या, वीज उपकेंद्र, कृषीपंप वाहिनी या सारख्या सुविधांची उभारणी केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा हा ८८ कोटींचा कंत्राट स्पेस एज या कंपनीला मिळाला आहे. हा कंत्राट १७ टक्के जादा दराने दिला गेल्याचे सांगण्यात येते. विशेष असे संपूर्ण इन्फ्रा - २ मधील सहा हजार कोटी रुपयांच्या कंत्राटाचे नियोजन व बाटप वीज महावितरण कंपनीच्या मुंबई मुख्यालयातूनच करण्यात आले. त्यातूनच यवतमाळ जिल्ह्यासाठी स्पेस एज या एजंसीची नियुक्ती झाली. दरम्यान गुरुवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची दारव्हा रोड स्थित पॉश हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला वितरण कंपनीच्या अकोला येथील मुख्य अभियंता कार्यालयातून अधीक्षक अभियंता सा.ही. खांडेकर (इन्फ्रा) तसेच यवतमाळचे वीज अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव व अन्य कार्यकारी, उप व कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. शासनाच्या कोणत्याही बैठका हॉटेलमध्ये आयोजित करू नये, कार्यालयातच घेतल्या जाव्या असे निर्देश आहेत. मात्र या निर्देशांकडे डोळेझाक करून अभियंत्यांनी हजेरी लावल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले. या बैठकीसाठी मुख्य अभियंता संजय ताकसांडे हेसुद्धा उपस्थित राहणार होते, असे सांगितले जाते. मात्र या बैठकीची माध्यमांना कुणकुण लागताच वीज अभियंत्यांनी सारवासारव केली. ताकसांडे यांना मूर्तीजापुरातच थांबविण्यात आले. दरम्यान वितरण कंपनीच्या अकोला परिमंडल कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात हॉटेलमधील ही बैठक कंत्राटदार कंपनीने नियोजनासाठी आयोजित केली होती. त्याला मार्गदर्शक म्हणून वीज अभियंत्यांनी उपस्थिती लावल्याचे नमूद केले आहे. या बैठकीवर वितरणने कोणताही खर्च केला नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)