शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

महागाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द

By admin | Updated: April 2, 2015 00:05 IST

तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

नामांकन प्रक्रिया सुरू : ३८ ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी कायममहागाव : तालुक्यातील पहिल्या टप्प्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. पैकी ३८ ग्रामपंचायतींची रणधुमाळी मात्र कायम असून, त्यासाठी ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत नामांकन दाखल करावयाचे आहेत. घोनसरा, कान्हा, सारखणी आणि कवठा या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्टमध्ये संपत असून, त्या दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, ३१ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. ८ एप्रिल रोजी छाणणी, १० ला विड्रॉल आणि २२ ला मतदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचे सुरू झालेल्या ग्रामपंचायतमध्ये गावागावात बैठका सुरू झालेल्या असून, बहुतांश ठिकाणी सदस्य संख्या वाढलेली असून, वार्डाचे नव्याने गठन करण्यात आलेले असल्यामुळे हमखास आता मीच निवउून येतो असे कोणीही छाती ठोपणे सांगु शकत नाही. सारेच गावपुढारी संभ्रमात पडले आहेत. गावावर आपले किंवा आपल्या गटाचे वर्चस्व सिद्ध करणारी ही निवडणूक असल्यामुळे उमेदवाराची निवड करताना पॅनल प्रमुखाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला मिळणाऱ्या विविध विकास फंडामुळे अतिशय महत्व प्राप्त झाले असून, सरपंच होण्यासाठी अनेक पुढारी आता पासूनच कंबर कसून बसले आहेत. पॅनल तयार करणे आणि तयार झालेल्या पॅनलसाठी कागदपत्राची जुळवाजुळव करणे यातच बरीच धांदल उडत असून, राखीव जागेसाठी काही ठिकाणी जात पडताळणी नसल्यामुळे उमेदवार मिळेनासे झाले आहे. तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींपैकी निम्म्या ग्रामपंचायतमध्ये पाणी टंचाईचे सावट असूनही निवडणुकीचा ज्वर चढल्यामुळे नागरिक आणि गाव पुढारी सारेच पाणीटंचाईचे चटके सहन करून गावागावात कॉर्नर बैठका घेण्यात मग्न झाले आहेत. तर जो कुणी पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचे आश्वासन देर्ईल, त्यालाच निवडून देण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)