शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

आर्थिक टंचाईतही निवडणूक

By admin | Updated: September 21, 2015 02:21 IST

कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचीही सोय नसलेल्या येथील खरेदी-विक्री संघाची निवडणूक घेतली जात आहे.

खरेदी विक्री संघ : नेर येथे काँग्रेस-राकाँ-भाजपा एकत्र, दोन लाखांचा भारनेर : कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचीही सोय नसलेल्या येथील खरेदी-विक्री संघाची निवडणूक घेतली जात आहे. निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी उसनवार करण्याची वेळ या संस्थेवर आली आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी ही निवडणूक घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस-राकाँ आणि भाजप एकत्र निवडणूक लढवित आहे. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी हे तीनही पक्ष एकत्र लढत आहे. २७ सप्टेंबर रोजी १७ जागांसाठी या संस्थेची निवडणूक होत असून ३४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी खरेदी-विक्री संघावर जवळपास दोन लाखांचा भार येऊन पडला आहे. उत्पन्नाचे स्रोत संपलेले असताना खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी पैशांची जुळवाजुळव करण्याकरिता दारोदार भटकत आहे. वास्तविक या संस्थेच्या विकासासाठी आजपर्यंत कुणीही चांगले प्रयत्न केले नाही. एक सेवानिवृत्त सचिव अवघ्या चार हजार रुपये महिन्यात खविसंचे काम सांभाळतात. एका गोडाऊन भाड्याच्या भरवशावर कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. या स्थितीत निवडणूक बिनविरोध व्हावी ही शेतकरी सभासदांची अपेक्षा होती. मात्र यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न झाले नाही. परिणामी खर्चाचा भार या संस्थेला सोसावा लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र असलेल्या भाजप-शिवसेनेने या निवडणुकीत वेगळी चूल मांडली आहे. भाजपने काँग्रेस-राकाँशी घरोबा केला आहे. केवळ शिवसेनेला टक्कर देण्यासाठी ही खेळी खेळली गेली आहे. आतापर्यंत या संस्थेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्ता भोगली आहे. या दोनही पक्षाच्या संचालकांनी संस्थेची स्थिती सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही. मात्र आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व वाढले आहे. या पक्षाला रोखण्यासाठी खरेदी-विक्री संघ निवडणुकीचे माध्यम वापरले जात आहे. मात्र यात एकत्र आलेल्या तीनही पक्षाला यश मिळणार की नाही, हे येणारा काळच ठरविणार आहे. मतदानानंतरच या संस्थेवर कोणाची सत्ता येते हे कळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)बँकेकडून घेणार कर्जनिवडणूक खर्चाच्या तरतुदीसाठी खरेदी-विक्री संघ नेर अर्बनकडून आगाऊ रकमेची उचल करणार आहे. नेर अर्बनने या संस्थेचे गोडाऊन किरायाने घेतले आहे. त्यापोटी या रकमेची उचल करून निवडणुकीचा खर्च भागवावा लागणार आहे. गोडाऊनच्या भाड्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन केले जातात. आगाऊ रक्कम उचलल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही अनियमित होण्याची भीती आहे.संस्था आपली आहे या भावनेतून यापूर्वीच्या कुठल्याही संचालकांनी विचार केलेला नाही. विकासाच्या बाबतीत या संस्थेला कधीही चांगले दिवस आले नाही. आता तर पैसा नसतानाही निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांमध्ये नाराजीचा सूर आहे. एकीकडे टंचाई आणि दुसरीकडे निवडणुकीचा खर्च असे विरोधाभासी चित्र आहे.निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी नेर अर्बन बँकेकडून अग्रीम रक्कम उचलण्याशिवाय पर्याय नाही.- अरविंद देशमुख, प्रभारी व्यवस्थापक, खविसं, नेरया निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी व काँग्रेससोबत आहोत. शिवसेनेच्या विरोधात ही निवडणूक लढवित आहोत.- पुरुषोत्तम लाहोटी, तालुकाध्यक्ष भाजपा, नेर