शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सभापतिपदांसाठी चुरस वाढली

By admin | Updated: March 6, 2017 01:21 IST

जिल्ह्यातील १६ पंचायत समिती सभापतींसाठी चुरस वाढली आहे. येत्या १४ मार्चला निवड होत असून त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

१४ मार्चला निवड : पंचायत समितीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी यवतमाळ : जिल्ह्यातील १६ पंचायत समिती सभापतींसाठी चुरस वाढली आहे. येत्या १४ मार्चला निवड होत असून त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्ह्यातील १६ पंचायत समित्यांपैकी पांढरकवडा, नेर, दारव्हा, कळंब, घाटंजी व बाभूळगाव या सहा पंचायत समितींचे चित्र स्पष्ट आहे. पांढरकवडा, नेर व दारव्हामध्ये शिवसेनेचा सभापती होईल. कळंबमध्ये काँग्रेस, तर बाभूळगाव आणि घाटंजीत भाजपाची सत्ता येईल. उर्वरित १० पंचायत समितींमध्ये सर्वच पक्षांना ‘जोडतोडी’चे राजकारण करावे लागणार आहे. पुसद, महागावमध्ये राष्ट्रवादीला एका सदस्याची मदत लागणार आहे. उमरखेडमध्ये काँग्रेसला बहुमतासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांना सोबत घ्यावे लागेल. यवतमाळात शिवसेनेला, तर वणीत भाजपाला एका सदस्याची गरज आहे. मारेगावमध्ये काँग्रेसला, तर झरीत भाजपाला एका सदस्याची गरज आहे. आर्णीत काँग्रेसला, तर दिग्रसमध्ये शिवसेनेला एक सदस्य सोबत घ्यावा लागेल. या जुळवणीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)जुळवाजुळव न झाल्यास ईश्वरचिठ्ठीकाही पंचायत समितींमध्ये आवश्यक सदस्यांची जुळवाजुळव न झाल्यास ईश्वरचिठ्ठीने सभापती व उपसभापतींची निवड होणार आहे. राळेगाव पंचायत समितीत तर हमखास ईश्वरचिठ्ठी होणार आहे. जिल्हा परिषदेची रंगीत तालीमपंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवड जिल्हा परिषद सत्ता स्थापनेची रंगीत तालीम ठरणार आहे. पंचायत समितीमधील घडामोडींवरून जिल्हा परिषदेत नेमकी कुणाची सत्ता येणार, याचा अदमास येणार आहे. सध्या मुंबईतील घडामोडींवरून अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मुंबईप्रमाणे येथे स्थिती झाल्यास काय करायचे, याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीत खल सुरू आहे. त्यासाठी काँग्रेसने ११ मार्चला आपल्या जिल्हा परिषद सदस्यांची यवतमाळात बैठक बोलाविली आहे.