शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पालिका समिती सभापतींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:53 IST

जिल्ह्यातील पाच नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड प्रक्रिया शनिवारी पार पडली. पुसदमध्ये जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळाली. उमरखेडमध्ये नवीन चेहरे देण्यात आली. दिग्रसमध्ये सत्तेसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र आली.

ठळक मुद्देआर्णीत चारही पदांवर महिला : पुसदमध्ये जुन्या तर उमरखेडमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी, घाटंजी नगर परिषद बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पाच नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड प्रक्रिया शनिवारी पार पडली. पुसदमध्ये जुन्याच चेहऱ्यांना संधी मिळाली. उमरखेडमध्ये नवीन चेहरे देण्यात आली. दिग्रसमध्ये सत्तेसाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र आली. आर्णी नगरपरिषदेत चारही पदांवर महिलांची निवड झाली. घाटंजी नगरपरिषदेत सर्व सभापती बिनविरोध निवडण्यात आले.पुसद पालिकेत जुन्यांनाच संधीपुसद : येथील पालिका सभापती पदाच्या निवडणुकीत जुन्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. जुन्याच सभापतींची पुनर्निवड करण्यात आली. शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी निवड बैठकीत सभात्याग केला.पालिका सभागृहात दुपारी ३ वाजता सभापती निवडीची बैठक झाली. नगराध्यक्ष अनिताताई नाईक, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, मुख्याधिकारी शेषराव टाले, यावेळी उपस्थित होते. आरोग्य सभापती पदी तिसऱ्यांदा अ‍ॅड. भारत जाधव तर पाणी पुरवठा सभापती म्हणून राजू दुधे यांची सहाव्यांदा निवड झाली. काँग्रेसच्या साबिराबी यांची बांधकाम सभापती म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली. शिक्षण सभापती म्हणून इंदिराबाई गवळी तर महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी दीपाली धुळे यांची फेर निवड झाली.पुसद पालिकेवर राष्ट्रवादी व काँग्रेची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक शेख फिरोज शेख अफसर यांचे जात प्रमाणपत्र हिंगोली येथील जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने खारीज केले होते. तरीही त्यांना निवडणुकीत सहभाग घेवू दिल्याने शिवसेनेने पिठासीन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर शिवसेना व भाजपाच्या नगरसेवकांनी निवड सभेतून सभात्याग केला.उमरखेडमध्ये नवीन चेहरेउमरखेड : येथील नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदांसाठी शनिवारी नगरपरिषद सभागृहात निवडणूक झाली. यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या अयक्षतेखाली निवड सभा झाली. दुपारी १ वाजता नामांकन दाखल करणे सुरू झाले. सत्ताधारी शहर विकास आघाडी वगळता विरोधकांनी नामांकन दाखल न केल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. सताधारी गटाची युती असलेल्या शहर विकास आघाडीतर्फे बांधकाम सभापती म्हणून भाजपाच्या कविता खंदारे यांची निवड झाली. आरोग्य सभापतीपदी भाजपाच्याच अनुप्रिता देव, तर पाणीपुरवठा सभापती म्हणून भाजपाचेच दिलीप सुरते यांची वर्णी लागली. शिक्षण सभापतीपदी भाजपाचेच प्रकाश दुधेवार, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या रेखा गवळे यांची निवड झाली. विद्यमान उपाध्यक्ष अरविंद भोयर यांची नियोजन समिती सभापतीपदी निवड झाली.स्थायी समिती सदस्य म्हणून मावळते आरोग्य सभापती तथा अपक्ष नगरसेवक अमोल तिवरंगकर आणि स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा, तसेच एमआयएमचे मुजीबुर रहेमान यांची वर्णी लागली. नगराध्यक्ष नामदेव ससाणे वगळता एमआयएमचे आठ, सताधारी भाजपाचे सात, शिवसेनेचे चार, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि एक अपक्ष नगरसेवक आहे. महिलांना सहापैकी तीन समित्यांवर संधी मिळाली.घाटंजीत बिनविरोध निवडघाटंजी : येथील पालिकेच्या विषय समिती सभापतींची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली.नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवड प्रक्रिया घेण्यात आली. यात घाटंजी विकास आघाडीच्या नगरसेवकांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्याकडे पाणीपुरवठा समितीचे सभापतिपद सोपविण्यात आले. बांधकाम सभापती म्हणून विजय नामदेव रामटेके, शिक्षण श्याम वसंतराव खांडरे, आरोग्य सीता अनंता गिनगाले, तर महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून सुवर्णा सदानंद गोमासे यांची निवड करण्यात आली. उपसभापती म्हणून वर्षा उईके यांची वर्णी लागली.आर्णीत महिला राजआर्णी : येथील नगरपरिषदेच्या विषय समिती पदांसाठी शनिवारी निवडणूक घेण्यात आली.नगरपरिषदेच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. यात बांधकाम सभापतिपदी मंगला रमेश ठाकरे तर पाणीपुरवठा समिती सभापती म्हणून अनिता सुनील भगत यांची निवड झाली. आरोग्य सभापती म्हणून सिंधू संतोष पारधी तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी सुषमा गजानन सुरटकर यांची निवड झाली. चारही समित्यांवर महिलांची वर्णी लागली. त्यामुळे आर्णी पालिकेत एक प्रकारे महिलाराज निर्माण झाले आहे. नवनिर्वाचित सभापतींचे साजीद बेग यांनी कौतुक केले.

टॅग्स :Electionनिवडणूक