शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीपूर्वीच दारव्हा भाजपात गटबाजीचे प्रदर्शन

By admin | Updated: January 23, 2017 01:03 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जिल्हा भाजपाकडून जोरदार तयारी सुरू असताना

प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी : मेळाव्याच्या प्रसिद्धीपासून ठेवले दूर दारव्हा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जिल्हा भाजपाकडून जोरदार तयारी सुरू असताना दारव्हा तालुक्यात मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी उफाळून आली आहे. याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या निमित्ताने दारव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रसिद्धीपासून स्थानिक नेते आणि आजीमाजी पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारसुद्धा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा वाद काय वळण घेतो याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी काही जणांनी भाजपात प्रवेश घेतला. या मेळाव्याच्या प्रसिद्धीसाठी काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महत्त्वाच्या नेत्यांची नावे टाकण्यात आली नाही. तसेच काहींच्या प्रवेशालासुद्धा प्रसिद्धी देण्यात आली नाही. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. अजय दुबे, माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा सचिव सुधीर अलोणे, जिल्हा सचिव आनंद दुबे, पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव ढोले, तालुका उपाध्यक्ष मनोहर भेंडे आदींसह काही प्रमुख नेत्यांची नावे न टाकता इतरांना प्रमुख उपस्थितांमध्ये स्थान दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रा. अजय दुबे केवळ उपस्थितच नव्हते तर त्यांनी मार्गदर्शनपर भाषणसुद्धा केले. यासोबतच ज्यांनी मेळाव्याचे संचालन आणि मार्गदर्शन केले ते नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत मुंगीलवार, भाजपात प्रवेश घेतलेले माजी जिल्हा परिषद सदस्य जानूसिंग राठोड यांच्या प्रवेशाचा उल्लेखही करण्यात आला नाही. या प्रकाराबाबत प्रा. अजय दुबे यांनी संताप व्यक्त केला असून याची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे सांगितले. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडून योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)