शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आठ नगरपरिषदांचे मुख्याधिकारी हागणदारीमुक्तीत नापास

By admin | Updated: May 8, 2017 00:13 IST

जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांचे मुख्याधिकारी हागणदारी मुक्तीत नापास ठरले. त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत घेण्यात येणार आहे.

‘सीआर’मध्ये नोंद : मुदतवाढ देऊनही घोषणा नाही, शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा, वाढीव मुदतीतही निर्देशांकडे दुर्लक्ष सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांचे मुख्याधिकारी हागणदारी मुक्तीत नापास ठरले. त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत घेण्यात येणार आहे. त्यांच्याविरूद्ध कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाईदेखील प्रस्तावीत असल्याने आल्याने मुख्याधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील यवतमाळसह वणी, घाटंजी, आर्णी, पुसद, दिग्रस, नेर, उमरखेड या आठ नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना त्यांची शहरे हागणदारीमुक्त असल्याची घोषणा करणे अनिवार्य करण्यात आले होते. देश आणि राज्य पातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत हागणदारीचा बंदोबस्त करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी वैयक्तीक शौचालय योजना शासन अनुदानातून सुरू करण्यात आली. घर तेथे शौचालयावर भर देण्यात आला. ही योजना राबविण्यात माघारलेल्या नगरपरिषदा ‘हागणदारीमुक्त शहर’ अशी घोषणा करू शकल्या नाहीत. नगरपरिषद क्षेत्र हागणदारी मुक्त असल्याची घोषणा करावी, याबाबत ३० जानेवारी रोजी नगरविकास विभागाने आदेश काढला. या आदेशानुसार सर्व मुख्याधिकाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत त्यांचे शहर हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा करणे बंधनकारक होते. मात्र या कालावधीत जिल्ह्यातील आठ नगपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी तशी घोषणा केली नाही. त्यांना शासनाकडून पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. त्यांना ३० एप्रिलपर्यंत उघड्यावरील हागणदारी थांबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. तरीही त्यांनी घोषणा केलीच नाही. आता मुख्याधिकाऱ्यांच्या थेट गोपनिय अहवालात प्रतिकूल शेरे नोंदवून त्यांच्याविरूद्ध कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियमांचा भंग केल्याबद्दल शिस्त व अपिल नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. यांच्यावर उगारणार कारवाईचा बडगा यवतमाळ येथील मुख्याधिकारी सुदाम धुपे, नेर-नबापूरचे धीरज गोहाड, उमरखेडचे प्रवीण मानकर, दिग्रसचे शेषराव टाले, पुसदचे अजय कुरवाडे, आर्णीच्या निर्मला राशीनकर, घाटंजीचे अशोक गराटे आणि वणीचे मुख्याधिकारी दीपक इंगोले यांच्याविरूद्ध आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या आठ मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच शहर हागणदारी मुक्त झालयाची घोषणा अद्याप केलीच नाही. त्यामुळे शासन निर्णयानुसार ते कारवाईस पात्र ठरतात. यावर नगरविकास प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.