शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

इस्टेट ब्रोकरकडे आठ लाखांची घरफोडी

By admin | Updated: June 18, 2015 01:58 IST

रियल इस्टेट ब्रोकरचे घर फोडून चोरट्यांनी सात लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. वडगाव

बोरेले ले-आऊट : चोऱ्या वाढल्या, भीतीचे सावट, नागरिकांनो, सतर्कता बाळगा यवतमाळ : रियल इस्टेट ब्रोकरचे घर फोडून चोरट्यांनी सात लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. वडगाव रोड पोलिसांच्या रात्रगस्तीला आव्हान देणारी ही घटना रात्री बोरेले ले-आऊटमध्ये घडली. राजू अर्जुनराव खंडाळकर असे या ब्रोकरचे नाव आहे. रात्री १.३० वाजताच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. मेन गेटवरून चोरट्यांनी आत प्रवेश मिळविला. ते मागच्या बाजूने बेडरुमकडे पोहोचले. तेथे खिडकीत लावलेला कुलर बाजूला काढून ठेऊन त्यांनी ग्रील तोडली. त्यातून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कपाट फोडले. त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून बेडरुमचा दरवाजा आतून बंद केला आणि त्याला गाद्या लावण्यात आल्या. कपाटातून चोरट्यांनी सात लाख रुपये रोख, अनुक्रमे २० ग्रॅम व ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र असा सुमारे आठ ते साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केला. राजू यांचे वडील आजारी असल्याने घरातील सर्व सदस्य त्यांच्यासोबत हॉलमध्ये एकाच ठिकाणी झोपले होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास खंडाळकर कुटुंबातील महिला उठल्यानंतर चोरीची ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वडगाव रोड पोलीस श्वानपथक व ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळी दाखल झाले. श्वान काही अंतरावर घुटमळले. कपाटावरील चोरट्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असून ते कुख्यात घरफोड्यांच्या रेकॉर्डवरील यादीत कुणाशी जुळते का हे तपासले जात आहे. बोरेले ले-आऊटमध्ये वर्षभरात किमान दहा ते बारा घरफोड्या होतात. सहा महिन्यांपूर्वी दिनकर धलवार यांचे बंद घर फोडण्यात आले होते. अरुण कांबळे यांच्या घरी सलग तीन वेळा चोरी झाली. जोशी व रिंगणे यांचे घरही फोडले गेले. विशेष असे खंडाळकर यांच्याकडील ही दुसरी चोरी आहे. तीन वर्षांपूर्वी ते शहरातच लग्नासाठी गेले असतात भरदिवसा त्यांचे घर फोडण्यात आले होते. या ले-आऊटमधील सार्वजनिक विहिरीवरील मोटारपंप चोरी जाण्याच्या घटनांनी तर जणू विक्रमच केला. गेल्या काही महिन्यात तब्बल ३० मोटारपंप या विहिरीवरून चोरीला गेल्या आहेत. यावरून बोरेले ले-आऊट परिसर चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येते. आठ लाखांच्या चोरीच्या या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांची रात्रगस्त असतानाही चोरटे आपल्या मोहिमेत यशस्वी होत असल्याने वडगाव रोड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. शहर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनीही घटनास्थळी भेट देऊन वडगाव रोड पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. नागरिकांकडून पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावले जात असताना पोलीसही नागरिकांच्या जागरुकतेबाबत नाराजी व्यक्त करीत आहे. अनेक सदस्य घरात झोपलेले असताना चोरटे ग्रील काढून, कपाट फोडून ऐवजावर हात साफ करतात आणि घरातील कुणालाच याची खबरबात लागत नाही याबाबत पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मालक घरात असताना चोरी होत असेल तर रस्त्यावरून गस्त घालणाऱ्या पोलिसांचा दोष काय असा प्रश्न पोलीस उपस्थित करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) पोलिसांच्या रात्रगस्तीला चोरट्यांचे आव्हानजिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्यात घरफोडीच्या तब्बल दीडशे गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. या पाच महिन्यात जिल्ह्यात सहा दरोडे, दोन दरोड्याची तयारी, २३ दिवसा घरफोड्या तर रात्रीला ११९ घरफोड्या एवढ्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांचा पोलिसांना छडा लावता आलेला नाही. पुसदमधील शासकीय कंत्राटदार जयंत चिद्दरवार यांच्या घरी पडलेल्या दहा लाखांच्या सशस्त्र दरोड्याचा अद्यापही थांगपत्ता नाही. दोन आठवडे उलटूनही दरोडेखोर नेमके कोण हे शोधण्यात पोलिसांना यश येऊ शकलेले नाही. नेहमी प्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून प्रगती दाखविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना दिसतो आहे. कधी लोकल असावे तर कधी मराठवाड्यातील असावे असे सांगून पोलीस वेळ मारुन नेताना दिसत आहे.