शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

शिक्षण विभागाने केले वर्षभराचे नियोजन

By admin | Updated: August 14, 2015 02:42 IST

जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांमध्ये वर्षभर राबवावयाच्या उपक्रमाचे नियोजन करून दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या टिप्स : डाटाबेस ‘सरल’विषयी मार्गदर्शन, मुख्याध्यापक उपस्थितवणी : जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांमध्ये वर्षभर राबवावयाच्या उपक्रमाचे नियोजन करून दिले आहे.या संदर्भात सोमवारी यवतमाळ येथील नंदुरकर विद्यालयात जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची सत्र नियोजन सभा झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतासिंह, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतासिंह यांनी मुख्याध्यापकांना महत्वाच्या ‘टिप्स’ देऊन आपण स्वत:च्या कार्यक्षेत्रात आपला ठसा कसा उमटवू शकतो, याविषयी मार्गदर्शन केले. ‘मी कोणत्याही उद््घाटन व कार्यक्रमाला जाण्याचे टाळतो, मात्र जेथे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे विचारमंथन असते तेथे न बोलविताही जातो. कारण मुख्याध्यापक व शिक्षक राष्ट्राचे निर्माते आहे. विकास गंगेचे वाहक आहे. मुख्याध्यापकांनी दररोज १५ मिनीट तरी आपल्या दिवसभराच्या कार्यावर चिंतन केले पाहिजे, मी माझ्या कार्यावर समाधानी आहोत काय, असा प्रश्न विचारला पाहिजे’, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. डॉ.आरती फुफाटे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व काय असते, हे आपल्या भाषणातून पटवून दिले. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी वसावे, रोहणे, चव्हाण, विविध विभागांचे प्रभारी मडावी, शेंडगे, विस्तार अधिकारी हजारे, शिक्षण उपनिरीक्षक चंद्रप्रकाश वाहने यांनी आपापल्या कक्षेतील योजनांची माहिती दिली. त्यात सरल डाटाबेस, आम आदमी विमा योजना, विविध शिष्यवृत्ती योजना, वरिष्ठ व निवड श्रेणीची नावे, मानव विकास मिशन उपक्रम, विविध स्पर्धा परीक्षा, शालेय स्वच्छतेचे महत्व, तंबाखू मुक्त शाळा, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, ईन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन, प्लॉस्टिक निर्मूलन, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास, नवोदय प्रवेश परीक्षा, या विषयावर नियोजनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. संचालन विस्तार अधिकारी खोब्रागडे यांनी केले. यावेळी रिलायन्स फाउंडेशनतर्फे प्रत्येक शाळेला दोन फुटबॉलचे मोफत वितरण करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)वेतन वेळवर होणारशाळांनी आपली वेतन देयके दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत पाठविली, तर वेतन एक तारखेलाच देणार, अशी ग्वाही शिक्षणाधिकारी वंजारी यांनी दिली. जीपीएफ पावत्यांसाठी तालुकानिहाय शिबिर लावले जाईल. सर्वांना जीपीएफच्या पावत्या मिळाल्याशिवाय मी सेवानिवृत्त होणार नाही, अशी ग्वाही वेतनपथक अधीक्षक चव्हाण यांनी दिली. थकबाकीची देयकेही त्वरित काढली जाईल, असे सांगण्यात आले.प्रत्येक शाळेत मिनी विज्ञान केंद्रजिल्ह्यातील प्रत्येक अनुदानित शाळेत ‘मिनी विज्ञान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोग, संगती, जमती यांचा लाभ घेता येईल. त्यासाठी मुख्याध्यापकांनी विहित प्रपत्रात माहिती भरून द्यावी, असे चंद्रप्रकाश वाहने यांनी सूचविले.वैयक्तिक मान्यतांची चौकशीमागील तीन वर्षात देण्यात आलेल्या वैयक्तीक मान्यतांची फेरतपासणी वरिष्ठ स्तरावरून केली जाणार आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांनी सन २०११ पासून मिळालेल्या वैयक्तीक मान्यतेच्या प्रस्तावाची कार्यालयीन प्रत शिक्षण विभागाकडे द्यावी, असे सूचविले. त्यामुळे काही बोगस वैयक्तीक मान्यता झाल्या असल्यास त्याचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.