लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरीसाठी सुशिक्षित तरुण अहोरात्र मेहनत घेत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने पदभरतीच बंद करून ठेवली आहे. यामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा होत असून शासनाने तत्काळ पदभरती घ्यावी, या मागणीसाठी यवतमाळात बुधवारी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढण्यात आला.यवतमाळच्या तिरंगा चौकात शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण बुधवारी एकत्र आले. त्यानंतर हा मोर्चा शहरातील विविध मार्गावरून काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात विदर्भातील अनुशेषाचा अहवाल प्रसिद्ध करावा. सरळ सेवेतील पदभरतीमध्ये ३० टक्के कपात धोरण रद्द करावे, विविध पदभरती घेऊन कंत्राटी पद्धत बंद करावी, अशी मागणी यात करण्यात आली. यावेळी आंदोलनाचे मुख्य संयोजक अॅड. संदीप गुजरकर, आशिष इंगोले, पवन देवतळे, रोहण मस्के, भूषण तायडे, ऋषेश बोरुले, प्रशांत मोटघरे, गौरव क्षीरसागर, मयूर चंद्रे, नीलेश बोथले, माधव घोंगेवाड, प्रफुल्ल रिंगोले, प्रतीक भगत, युवराज आडे, कैलास उलेमाले, विनोद सानप यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांच युवक मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आले होते.
सुशिक्षित बेरोजगारांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 21:47 IST
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरीसाठी सुशिक्षित तरुण अहोरात्र मेहनत घेत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने पदभरतीच बंद करून ठेवली आहे.
सुशिक्षित बेरोजगारांचा मूक मोर्चा
ठळक मुद्देनोकरभरतीची मागणी : स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा पुढाकार