शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार विहिरींना ग्रहण

By admin | Updated: January 24, 2015 23:00 IST

जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जवाहर रोजगार आणि धडक सिंचन योजनेतून हजारो विहिरींचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. यातील चार हजार ४९१ विहिरींचे काम अर्ध्यावर थांबले आहे.

रोहयोत वर्ग : मोबदल्यावरून यंत्रणेत उदासीनतायवतमाळ : जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जवाहर रोजगार आणि धडक सिंचन योजनेतून हजारो विहिरींचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. यातील चार हजार ४९१ विहिरींचे काम अर्ध्यावर थांबले आहे. आता या विहिरींना पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेत रूपांतरित करण्यात आले आहे. अर्धवट काम झालेल्या विहिरींचे पैसे कोण देणार याबाबत शासकीय यंत्रणेत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे साडेचार हजार विहिरींनी ग्रहण लागले असून शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती आहे.धडक सिंचन योजनेतील विहिरींना पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्यात आले. त्यासाठी ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. शिवाय विहिरीचे अनुदानही अडीच लाखावरून तीन लाख रुपये करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ही योजना रूपांतरित करीत असतानाच्या तांत्रिक अडचणींकडे शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता अंमलबजावणी करताना मोठी समस्या निर्माण झाली आहे. धडक सिंचन योजनेतून दहा ते बारा फूट विहीर खोदलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. आता या अपूर्ण विहीरी रोजगार हमी योजनेत समाविष्ट केल्यानंतर नव्याने केलेल्याच खोदकामाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे झालेल्या कामाचे पैसे मागायचे कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. धडक सिंचन योजनेत एजन्सी म्हणून तब्बल १७ शासकीय कार्यालयांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याला दिले आहेत. या सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने योजनेच्या रूपांतरणातच अडचणी निर्माण झाल्या आहे. धडक सिंचनच्या चार हजार ४९१ विहिरींपैकी तीन हजार ४ विहिरींना सुधारित प्रशासकीय मान्याता मिळाली आहे. उर्वरित एक हजार ४८७ विहिरींना अद्यापही प्रशासकीय मान्यता देण्यात आली नाही. कृषी अधीक्षकांच्या अधिनस्थ असलेल्या विहिरींना प्रशासकीय मंजुरी देण्याचा अधिकार तहसीलदारांना दिला आहे. प्रत्यक्षात मात्र तसे प्रस्तावच तहसीलदारांकडे पोहोचलेले नाही. त्यामुळे एकंदरच या योजनेत मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. प्रशासकीय मान्यतेची तारीख अथवा ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ असे दोन निकष या विहिरींच्या रूपांतरणासाठी लावले जात आहे. यातच गफलत होत असल्याने शेतकऱ्यांना झालेल्या कामाचा मोबदला मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांनी उधार-उसणवार करून विहिरींचे काम केले. मात्र तेही अर्धवट आहे. या कामांवर झालेल्या खर्चाचा मोबदला देणार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)