शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

पुढच्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:41 IST

मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’

ठळक मुद्देगणरायाला दिला निरोप : सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’ च्या जयघोषात पुढच्या वर्षी येण्याचे साकडे घालत सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी (दि.५) निरोप दिला. विसर्जनाला सुरूवात झाल्याने शहरात सर्वत्र गणपतीच्या मिरवणुका दिसत होत्या.विघ्नहर्ता व मांगल्याच्या देवताच्या उत्सवाची परिसरासह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांत ख्याती आहे. त्यात शहरातील गणपती उत्सवाची बात काही औरच आहे. येथील काही मोठ्या मंडळांकडून साजरा करण्यात येणारा उत्सव शहराची शानच आहे. त्यामुळे बाहेरगावहून भाविक शहरातील उत्सव बघण्यास येतात. २५ आॅगस्ट रोजी मोठ्या थाटात गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गणपतीच्या उत्सवाचे हे दिवस नवचैतन्याचेच असतात. त्यामुळेच हे १२ दिवस भुर्रकन निघून गेले व अखेर दिवस उजाडला तो लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा. मंगळवारी सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाल्याचे चित्र होते. कुणी हातात, कुणी डोक्यावर, कुणी हातठेल्यांवर, कुणी रिक्शात तर कुणी चारचाकी वाहनांत गणरायांना घेऊन विसर्जनासाठी नदी व तलावांवर जात असल्याचे चित्र होते. यात गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणूका आकर्षणाचे केंद्रच होत्या. ढोलताशांवर नाचत गात तरूणाई गुलाल उधळत ‘गणपती बाप्पा मोरया... ’चा जयघोष करीत जात असल्याचे दिसून आले. मागल्यांचे देवता गणपती यंदा १२ दिवस आपल्या घरात विराजमान असल्याने त्यांना सहाजीकच भारी मनाने निरोप देण्यात आला. मात्र पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रणही बाप्पांना देण्यात आले.प्रथमच डिजेविना विसर्जनशासनाने डिजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला शहरातील व जिल्ह्यातील गणेश मंडळांनी साथ देत डिजेचा वापर टाळीत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश विसर्जन केले.मंगळवारी सर्वाधिक विसर्जनव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून मंडळांना विसर्जनासाठी दिवस वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार २ तारखेपासूनच विसर्जनाला सुरूवात झाली आहे. तर शेवटचे विसर्जन ९ तारखेला होणार असल्याचे दिसून येत आहे. यात मात्र मंगळवारी (दि.५) सर्वाधिक विसर्जन करण्यात आले. शहर पोलिसांनी ४८ मंडळांना तर रामनगर पोलिसांनी २० मंडळांना विसर्जनाच्या तारखा दिल्या होत्या. शिवाय हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, गणपती विसर्जनाच्या तारखांना घेऊन पोलीस विभागाकडून शेवटचा दिवस कोणता हे कळले नाही. तर रामनगर पोलिसांकडून ठरवून दिलेल्या तारखांबाबत संभ्रम होता.विसर्जनस्थळांवर गर्दीशहरातील पांगोली नदी छोटा गोंदिया- खमारी, सरकारी तलाव, साई मंदिर नाग तलाव, रजेगाव घाट, छोटा गोंदिया देवतलाव येथे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. त्यामुळे या विसर्जन स्थळांवर एकच गर्दी दिसून आली. शहरात हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींची स्थापना केली जात असल्याने त्यात सार्वजनिक मंडळांची भर पडत असल्याने विसर्जन स्थळांवर भाविकांची एकच गर्दी दिसून आली.शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्तविसर्जनाला सुरूवात झाली असून सुरक्षा व व्यवस्थेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. बंदोबस्तांतर्गत चौकाचौकांत पोलीस कर्मचाºयांची ड्यूटी लावण्यात आली होती. यासह वाहतूक पोलीसही त्यांच्या सोबत होते. तसेच विसर्जन स्थळांवरही पोलिसांसह होमगार्डचा बंदोबस्त होता. याशिवाय पेट्रोलींग पथक व पोलीस निरीक्षकांचे पथक सुद्धा नजर ठेऊन होते.