शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ई-निविदांना जाचक अटीखाली लावला जातो सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:05 IST

निविदा मॅनेज होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेलाही आता लाचखोरांनी सुरुंग लावला आहे.

ठळक मुद्देमॅनेजचा नवा फंडा : यवतमाळ, बाभूळगाव, घाटंजी पालिकेतील प्रताप, नोंदणीकृत ठेकेदार सोडून नवख्यांना दिले जातेय कंत्राट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निविदा मॅनेज होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेलाही आता लाचखोरांनी सुरुंग लावला आहे. जाचक अटीच्या आड मर्जीतील ठेकेदारांना काम दिले जाते. बाभूळगाव नगरपंचायतीने तर चार लाखाच्या कामासाठी तब्बल ५८ अटी लादल्या आहे. यवतमाळ, घाटंजी नगरपरिषदेतही कमी-अधिक प्रमाणात असाच प्रकार सुरू आहे.ई-निविदेत छेडछाड करता येत नसल्याने प्रक्रिया मॅनेज करण्यासाठी अनावश्यक अटींचा आधार घेतला जातो. जेणे करून तीनपेक्षा कमीच निविदा येतील. त्यानंतर या निविदा रिकॉल केल्या जातात. तातडीच्या कामांच्या निविदा अशाप्रकारे रखडविण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधी व नगरसेवकांचा दबाव वाढल्यानंतर घाईगडबडीत आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिले जाते. हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. परिणामी कामे वेळेत पूर्ण होत नाही. क्षमता नसलेल्या संस्थेला, ठेकेदाराला काम देऊन त्याचा दर्जाही जोपासला जात नाही. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.यवतमाळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील विहिरींच्या साफसफाई व दुरुस्तीची निविदा प्रसिद्ध केली. यामध्ये जाणीवपूर्वक जाचक अटी लावल्या आहे. एकीकडे बांधकाम व नगरपरिषदेत नोंदणी असलेल्या ठेकेदाराला काम घेता येणार नाही, तर दुसरीकडे साधे प्लंबिंगचे काम करणाºया व्यक्तीला संधी दिली आहे.इतकेच नव्हे तर किती विहिरी दुरुस्त करावयाच्या आहे, त्याचे बजेट काय याचाही उल्लेख केलेला नाही. काम घेणाºया संस्था व ठेकेदारांकडे आर्थिक ऐपतीची मागणीसुद्धा केलेली नाही. शहरातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता ही निविदा प्रक्रिया सुटसुटीत पद्धतीने करणे आवश्यक होते. त्यासाठी ढोबळमानाने अत्यावश्यक असलेल्या अटी ठेवणे अपेक्षित होते. मात्र कुणी निविदेला पात्रच ठरू नये अशा काही अटींचा यात समावेश केला आहे.बाभूळगाव नगरपंचायतीने तर सिमेंट रस्ता बांधकामासाठी तब्बल ५८ अटी लादल्या आहेत. घाटंजी नगरपरिषदेने स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण व गार्डनिंगच्या कामात हॉटमिक्स प्लाँटची अट घातलेली आहे. यावरून पालिकास्तरावरील कामे वेळेत पूर्ण होत नाही.काम मिळविण्यासाठी ४० टक्के खर्चठेकेदारांचा निविदा प्रक्रियेला प्रतिसाद नसल्याचे चित्र निर्माण करून पालिकेतील प्रशासकीय यंत्रणा हितसंबंध असलेल्या ठेकेदारांच्या घशात कामे घालतात. हा प्रकार पूर्वीच्या निविदा प्रक्रियेपेक्षाही घातक ठरत आहे. काम घेणाऱ्या कंत्राटदाराला काम मिळविण्यासाठीच ४० टक्के रक्कम खर्च करावी लागते. उरलेल्या ६० टक्क्यात प्रत्यक्ष काम केले जाते. यावरून त्या कामाचा काय दर्जा जोपासला जात असेल याची कल्पनाच न केलेली बरी. या प्रकाराबाबत कुणीही बोलायला मात्र तयार नाही.