शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निर्गुडा नदीत बुडाल्याने बालकाचा मृत्यू

By admin | Updated: April 3, 2017 00:33 IST

येथील निर्गुडा नदीत बुडून एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

शोककळा : पोहोण्याचा मोह जीवावर बेतला वणी : येथील निर्गुडा नदीत बुडून एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. आर्यन मनोज जुमळे असे मृत बालकाचे नाव असून तो स्थानिक तेली फैल भागातील रहिवासी आहे. तो नांदेपेरा मार्गावरील पालिकेच्या शाळा क्रमांक पाचमध्ये ईयत्ता चौैथीचा विद्यार्थी होता. रविवारी शाळेला सुटी असल्याने काही मित्रांसमवेत तो येथील निर्गुडा नदीत पोहण्यासाठी गेला. मात्र पोहत असताना खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने हादरलेल्या त्याच्या मित्रांनी घरी जाऊन घटनेची माहिती त्याच्या पालकांना दिली. मृत आर्यनचे वडिल मनोज जुमळे यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. आर्यनला नदीच्या पात्रातून बाहेर काढून तातडीने येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. मृत आर्यन हा अतिशय तल्लख बुद्धीचा विद्यार्थी होता. अभ्यासात तो हुशार होता. त्याचे आई-वडिल मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवितात. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी आर्यनच्या तीन वर्षीय लहान भावाचे आजाराने निधन झाले. त्यानंतर लगेच ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण जुमळे कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहे. स्थानिक निर्गुडा नदीच्या बंधाऱ्याजवळ चार महिन्यापूर्वीच एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. (कार्यालय प्रतिनिधी)