लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : विविध शासकीय योजनेतील घरकूल लाभार्थ्यांना रेतीचा फ्री पास द्यावा, या मागणीसाठी सोमवारपासून लाभार्थ्यांनी येथील तहसीलसमोर डफडे आंदोलन सुरू केले.तालुक्यात रेती तस्करांनी उच्छाद मांडला आहे. खुलेआम रेती तस्करी केली जात आहे. मात्र घरकूल लाभार्थ्यांना रेती मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मुडाणा व दगडथर परिसरातील घरकूल लाभार्थ्यांनी डफडे आंदोल सुरू केले आहे. शासन परिपत्रक २०१८ अन्वये सामित्वधन न आकारता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत स्वत:च्या घराच्या बांधकामाकरिता घरकूल लाभार्थ्यांना झिरो रॉयल्टी फ्री पास देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी यापूर्वी २३ जानेवारीला तहसीलदारांना निवेदन दिले होते. मागणी मान्य झाल्यास ठिय्या डफडे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.निवेदनाची महसूल प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारपासून अॅड.कैलास वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी रेतीपाससह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा मुख्यालयी राहात नसल्यास निवास भत्ता रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनात परमेश्वर बर्डे, दिगंबर खंदारे, रमेश पतंगे बळीराम वानखेडे, दिलीप बर्डे, नंदकुमार वाघमारे, गजानन वानखेडे, गजानन काळे आदी सहभागी आहे. मागणी मान्य होईपर्यंत डफडे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
महागावात लाभार्थ्यांचे डफडे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत स्वत:च्या घराच्या बांधकामाकरिता घरकूल लाभार्थ्यांना झिरो रॉयल्टी फ्री पास देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी यापूर्वी २३ जानेवारीला तहसीलदारांना निवेदन दिले होते. मागणी मान्य झाल्यास ठिय्या डफडे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
महागावात लाभार्थ्यांचे डफडे आंदोलन
ठळक मुद्देतहसीलसमोर ठिय्या : बांधकामासाठी रेतीचा फ्री पास देण्याची मागणी