शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यागत मंडळातही गाजली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:57 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही पाणीटंचाईचा मुद्दा गाजला. महाविद्यालयातील रुग्णसेवा पाण्याअभावी खंडित होऊ नये यासाठी अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षांनी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये बैठक : वैयक्तिकस्तरावरही सहकार्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीतही पाणीटंचाईचा मुद्दा गाजला. महाविद्यालयातील रुग्णसेवा पाण्याअभावी खंडित होऊ नये यासाठी अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षांनी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे.वैद्यकीय महाविद्यालयात पाण्याअभावी काही दिवस शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. भीषण टंचाईमुळे आजही पुरेसे पाणी वॉर्डात पोहोचत नाही. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून कसाबसा मेडिकलचा कारभार सुरू आहे. या टंचाईच्या काळात सर्वांनीच वैयक्तिकस्तरावर मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ.अशोक उईके यांनी केले आहे.या बैठकीत अधिष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार यांनी पाणीटंचाईची भीषणता मंडळ सदस्यांपुढे मांडली. यावेळी सदस्य प्रवीण प्रजापती यांनी २४ हजार लिटर पाण्याच्या नियोजनाबाबत प्रयत्न करण्याची हमी घेतली. १२-१२ हजार लिटर दोन टँकर महाविद्यालयाला देण्यात येईल असे सांगण्यात आले. सध्या येथील होस्टेलमध्ये सुपर स्पेशालिटीच्या बोअरवरून पाणीपुरवठा सुरू असल्याचे अधिष्ठातांनी सांगितले. पाणी पुरवठ्यासाठी निधीची कमतरता असून याकरिता सामाजिक दायित्व म्हणून येथे कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे असेही आवाहन करण्यात आले.या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे, वीज वितरण कंपनीशी निगडित कामे विशेष करून एक्सप्रेस फिडरवरून अखंडित वीज पुरवठ्याचा मुद्दा चर्चेला आला. अनेक वर्षापासून एक्सप्रेस फिडरचे काम केवळ चर्चेपुरतेच मर्यादित असल्याचे सांगण्यात आले. अजूनही अखंडित वीजपुरवठ्या मेडिकलमध्ये उपलब्ध नाही. याबाबत तातडीने उपाययोजनेचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. बर्न वॉर्डमध्ये एसी लावण्याबाबतचा प्रस्ताव मागील बैठकीत ठेवला होता. त्याप्रमाणे या वॉर्डात एसी बसविण्यात आल्याचे अधिष्ठातांनी बैठकीत सांगितले. बैठकीला जिल्हा परिषद आरोग्य सभापती नंदनी दरणे, नितीन भुतडा, अमोल ढोणे आदींसह सदस्य उपस्थित होते.