शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छानिवृत्ती अर्ज देऊन दारव्हा ठाणेदार अचानक आजारी रजेवर

By admin | Updated: June 15, 2017 00:56 IST

येथील ठाणेदार अनिलसिंग गौतम यांनी बुधवारी अचानक स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज वरिष्ठांना सादर करून ठाण्याचा प्रभार सोडला.

नागरिकांचा रास्ता रोको : कायम राहण्यासाठी एसडीपीओंना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क दारव्हा : येथील ठाणेदार अनिलसिंग गौतम यांनी बुधवारी अचानक स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज वरिष्ठांना सादर करून ठाण्याचा प्रभार सोडला. याला कडाडून विरोध करीत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. गेल्या दीड वर्षांपासून अनिलसिंग गौतम दारव्हाचे ठाणेदार म्हणून कार्यरत आहे. त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. अनेक प्रतिष्ठीतांना त्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात ताटकळत ठेवले आहे. यामुळे सतत त्यांच्याविरुद्ध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यातच बुधवारी गौतम यांनी अचानक आपल्या स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. लगेच त्यांनी वैद्यकीय रजा घेऊन पोलीस ठाण्याचा प्रभारही सोडला. ही वार्ता शहरात पसरताच अनेक नागरिकांनी ठाण्याकडे धाव घेऊन गौतम यांची भेट घेतली. त्यांना स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मात्र गौतम यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे निराश झालेल्या अनेक नागरिकांनी बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या आंदोलनात शहरासह तालुक्यातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान नागरिकांनी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या भावना कळविल्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आपल्या कार्यपद्धतीमुळे पोलीस दलात चर्चेचा विषय ठरलेले गौतम यांनी अचानक निवृत्तीचा अर्ज सादर केल्याने विविध चर्चेला उधाण आले.