शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिलांचे घरटे बनविण्यासाठी सुगरणीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:09 IST

निसर्गाने हिरवा शालू परिधान करताच, सुगरणा पक्षांनाही विनीच्या हंगामाचे वेध लागले आहेत. आपल्या निरागस पिलांना सुरक्षित घर मिळावे, बाल्यावस्थेत ही पिलं सर्व संकटापासून मुक्त राहावी, यासाठी सुगरण पक्षातील नर विहिरीच्या अथवा पाणी साठ्याच्या काठावर असलेल्या काटेरी झुडूपांवर मनमोहक नक्षीकाम केलेले घरटे तयार करताना दिसत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । घरट्यांची पडते मानवाला भूरळ, काटेरी झाडांवर दिसू लागल्या पाखरांच्या वसाहती

देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : निसर्गाने हिरवा शालू परिधान करताच, सुगरणा पक्षांनाही विनीच्या हंगामाचे वेध लागले आहेत. आपल्या निरागस पिलांना सुरक्षित घर मिळावे, बाल्यावस्थेत ही पिलं सर्व संकटापासून मुक्त राहावी, यासाठी सुगरण पक्षातील नर विहिरीच्या अथवा पाणी साठ्याच्या काठावर असलेल्या काटेरी झुडूपांवर मनमोहक नक्षीकाम केलेले घरटे तयार करताना दिसत आहे.पावसाळ्याच्या सुरूवातीला रानावनात फिरताना सुगरण पक्षाची नक्षीकाम केलेली मनमोहक घरटी मानवाला भूरळ घालतात आणि नकळत बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओेळी आठवतात. ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला’ या बालपणी पाठ्यपुस्तकात अभ्यासलेल्या ओळी पाखरांच जगणं सांगतात. ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहिणाबार्इंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात, तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. हे सुगरण पक्षी एखाद्या झाडावर जणू आपले गावच बसवतात. जिथे मानवी रहदारी कमी असेल किंवा आपले गाव दिसणार नाही, अशी झाडे हा पक्षी निवडतो. या एकाच झाडावर त्याची १५ ते २० जणांची वस्ती विसावते. खास आपल्या पिलांच्या जन्मासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हे सुगरण पक्षी परिश्रमाने घरटी बनवितात. विशेष म्हणजे हे घरटे गवताच्या पातीपासून बनविली जातात. घरट्याच्या फुगीर भागात ओल्या मातीचा गिलावा असतो. पण फुगीर भागातून अंडी किंवा पिलं कधीही बाहेर पडत नाही. सुगरण हा पक्षी भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार या देशात आढळतो. पट्टेरी सुगरण, काळ्या छातीचा सुगरण आणि बाया, अशा तीन प्रकारचे सुगरण पक्षी प्रामुख्याने दिसून येतात. किटक व धान्य सुगरणीचे खाद्य आहे.असे बनविले जाते घरटेसुगरण पक्षाच्या घराचा आकार पालथ्या चंबूसारखा असतो. सुरूवातीला फांदीभोवती गवताचे धागे घट्ट विणून मजबूत लोंबता दोर तयार करतात. हा दोर एकट्या माणसाला तुटत नाही. त्याच्या आधारावर घरटे लोंबत ठेवले जाते. नंतर दोराच्या मोकळ्या धाग्यात दुसरे धागे गुंतवून घरटे बांधले जाते. घरटे मधोमध रूंद विणून त्याचे दोन भाग केले जातात. पहिला भाग बंद करून त्याला फुग्यासारखा आकार असतो. याला अंडकक्ष म्हणतात. यातच मादी अंडे घालते. नंतर ती उबविली जातात. दुसरा भाग विणून लांब व रूंद नळीसारखा बनविला जातो. याचे खालचे टोक उघडे असून घरट्यात शिरण्याचे ते दार असते. अंडकक्षाच्या आतील बाजूस चिखलाचे लिपण केलेले असते.खोप्यावरून होतेयं नराची निवडसुगरण पक्षी विणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर घरटी बांधायला सुरूवात करतात. जून ते सप्टेंबर हा सुगरण पक्षाच्या विणीचा हंगाम मानला जातो. काटेरी झाडावर घरटे तयार करण्याचे काम सुगरण पक्षातील नर करतात. घरट्यासाठी लागणाऱ्या गवताच्या पात्यासाठी तो ५०० ते ६०० वेळा खेपा मारतो. घरट्याचा काही भाग पूर्ण होण्याच्या सुमारास मादीचा थवा तिथे येतो आणि घरट्याच्या बांधणीवरून नराची निवड करतो.