शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शिक्षक महासंघाचा जुन्या पेन्शनसाठी उद्या अन्नत्याग

By admin | Updated: June 30, 2017 02:08 IST

राज्यघटनेत शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेचा उल्लेख आहे. तरीही संविधानाचे उल्लंघन करून

शेखर भोयर : ‘डीसीपीएस’ला विरोधलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यघटनेत शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेचा उल्लेख आहे. तरीही संविधानाचे उल्लंघन करून शासनाने डीसीपीएस-एनपीएस योजना लागू केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही नवीन अंशदायी परिभाषित योजना लागू करणे कायद्याशी विसंगत असल्याचे परखड मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले.१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची व्यथा त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडली. शिक्षक महासंघ आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले जाईल, अशी माहिती शेखर भोयर यांनी दिली. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये टप्प्या-टप्प्याने अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, उर्दू टीचर्स असोसिएशन आदींनी सक्रिय पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने मृत शिक्षकांच्या पाल्यांची हेळसांड होत आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्याच पगारातून कपात केलेली रक्कम तातडीने मिळावी. यासंदर्भात सर्व आमदारांना सभागृहात ठराव घेण्याची विनंती करण्यात येईल. तामीळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी शेखर भोयर यांनी केली. यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष नीलेश तायडे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रतिनिधी मिलिंद सोळंकी, य. ना. राठोड आदी उपस्थित होते.