शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

ढेपीचे भाव वाढल्याने दूध व्यावसायिक अडचणीत

By admin | Updated: August 17, 2016 01:13 IST

सरकीपासून तयर होणाऱ्या ढेपीचे भाव अचानक वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

पुसद : सरकीपासून तयर होणाऱ्या ढेपीचे भाव अचानक वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. प्रती क्विंटल ८०० ते १००० रुपयांची ही भाववाढ असून, व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अचानक झालेली ही भाववाढ कमी करून साठेबाजांवर योग्य कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा दुग्ध व्यवसाय हा शेतीला प्रमुख जोडधंदा आहे. या जोडधंद्याच्या भरवशावर ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व दूध विक्रेत्यांना भाववाढीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचा चारा हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अशातच जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरण्यात येणाऱ्या ढेपीची भाववाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ढेपीचे ६० किलोचे पोते एरवी १३०० ते १४०० रुपयाला मिळत होते.परंतु गेल्या महिन्यापासून ढेपेचे भाव २००० ते २२०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. पुसद येथे अकोला, अमरावती, खामगाव, जालना येथून ढेपेची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. जाड व बारीक अशा दोन प्रकारात ढेप येत असल्याने दूध वाढीसाठी पोषक आहार म्हणून ढेपेकडे पाहिले जाते. पुसद तालुक्यात दर महिन्याला तब्बल १६०० ते २००० पोत्यांची विक्री होत असते परंतु अचानक झालेल्या भाववाढीमुळे पशुपालकांनी ‘कॅटलफीड’ घेण्याकडे कल दाखविला आहे. २००० रुपयांचे ढेपेचे पोते घेण्यापेक्षा पशुपालकांनी ६०० ते १००० रुपयांपर्यंत मिळणारी कांडी घेणे पसंत केले आहे. भाववाढीमुळे पशुपालकांनी दुग्धव्यावसायिकांनी मका चुनी, तुवर चुनी, कांडी असे विविध प्रकारचे कॅटलफीड वापरण्यास पसंती दिली आहे. ढेपेची खरेदी कमी झाल्याने व्यावसायावर तब्बल ७५ टक्के परिणाम झाला आहे. एकीकडे शासनाने गोहत्या बंदी केली आहे. त्यामुळे कशाही परिस्थितीत जनावरांना जगवावे लागत आहे. नापिकी, दुष्काळी स्थिती, कर्जबाजारीपणा यामुळे आधीच शेतकरी पिचला आहे. त्यातून आत्महत्या होत आहे. (तालुका प्रतिनिधी)