शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

मुंगोलीवासीयांना पुराची धास्ती

By admin | Updated: June 20, 2016 02:13 IST

पावसाळा सुरू होताच तालुक्यातील मुंगोलीवासीयांची धाकधूक सुरू झाली आहे.

पुनर्वसनाकडे दुर्लक्ष : वर्धा नदीचा वेढा गावाला पडण्याचा धोका कायम वणी : पावसाळा सुरू होताच तालुक्यातील मुंगोलीवासीयांची धाकधूक सुरू झाली आहे. यावर्षी पावसाळा जोरात पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने मुंगोलीवासीय अधिकच धास्तावले आहे. पाऊस जोरात पडल्यास वर्धा नदीला आलेल्या पुरात आपले गाव डुबणार तर नाही ना, ही भिती त्यांना सतावत आहे. गावकऱ्यांनी कित्येक वर्षांपासून शासनाकडे पुनर्वसनाचा तगादा लावला. मात्र निगरगट्ट वेकोलि प्रशासन त्यांच्या हाकेला साद देण्याच्या मनस्थितीत नाही.तालुक्याच्या अंतिम टोकावर वसलेले मुंगोली गाव चोहोबाजूंनी वेकोलिचे ढिगारे व वर्धा नदीच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या २० वर्षांपासून गावकरी भयभीत अवस्थेत गावात वास्तव्य करीत आहे. गावाचे पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक असतानाही वेकोलिकडून पुनर्वसनासाठी चालढकल केली जात आहे. यासाठी गावकऱ्यांनी आत्तापर्यंत प्रशासनाला व वेकोलिला अनेकदा निवेदने दिली. कित्येक आंदोलने केली. वेकोलिचे काम बंद पाडण्याचे आंदोलनसुद्धा केले. गेल्यावर्षी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मध्यस्थी करून वेकोलिला पुनर्वसन करण्यास बाध्य करण्यासाठी कसून प्रयत्न केले. त्यावेळी वेकोलिने डिसेंबर २०१५ पर्यंत मुंगोलीचे पुनर्वसन करण्याचे लेखी आश्वासनही दिले. मात्र हे आश्वासन अजूनही पाळल्या गेले नाही. वर्धा नदीच्या खोऱ्यात व वणी-कोरपना तालुक्याच्या सीमा रेषेवर असलेल्या मुंगोली गावाजवळ २० वर्षांपूर्वी सन १९९४ मध्ये खान सुरू केली. त्यासाठी तेथील ७० टक्के शेतकऱ्यांची शेती वेकोलिने विकत घेतली. मात्र उर्वरित ३० टक्के शेतकऱ्यांच्या शेती न घेतल्याने त्या शेतकऱ्यांना अद्यापही गाव सोडता आला नाही. गावापासून हाकेच्या अंतरावर कोळसा खाण असल्याने खाणीत होणाऱ्या स्फोटाचे धक्के गावाला बसतात. त्यामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले. काही घरे कोसळूनही पडली. गावाच्या उत्तरेस वेकोलिची कैलासनगर वसाहत आहे. या वसाहतीच्या शौचालयाचे घाण पाणी गावाजवळ साचते. दक्षिणेस काहीच अंतरावर वेकोलिने टाकलेले मातीचे ढिगारे व दोन बाजूंनी वर्धा नदी, असे चारही बाजूंनी गाव कचाट्यात सापडले आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने वेकोलिच्या ढिगाऱ्यावरूनच मार्गक्रमण करावे लागते. स्फोटाच्या धुळीमुळे व उष्णतेमुळे शेतातील पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात या परिसरातील पैसेवारी ५० टक्केच्या आत आली होती. ग्रामपंचायतीनेही ठराव करून गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. नुकतेच यावर्षी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांनी या गावाला भेट देऊन पाहणी केली व वास्तव जाणून घेतले. तरी अजूनही गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळतच आहे. येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनीही या गावाचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे दिला आहे. तरीही वेकोलि मात्र अधिकाऱ्यांचे आदेशही मानायला तयार नाही. (स्थानिक प्रतिनिधी)