शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कोरडवाहू शेतीमुळे बळीराजा त्रस्त

By admin | Updated: May 24, 2015 00:14 IST

सुपीक जमीन व पांढऱ्या सोन्याचा परिसर म्हणून वणी तालुक्याची ख्याती आहे. तथापि तालुक्यात केवळ १७ टक्केच शेती ...

१७ टक्केच सिंचन : नापिकी, कर्ज, निसर्गाची अवकृपा सदैव कायमचवणी : सुपीक जमीन व पांढऱ्या सोन्याचा परिसर म्हणून वणी तालुक्याची ख्याती आहे. तथापि तालुक्यात केवळ १७ टक्केच शेती ओलिताखाली असून उर्वरित ८३ टक्के शेती कोरडवाहू आहे. या कोरडवाहू शेतीमुळे आता बळीराजा त्रस्त झाला आहे.तालुक्यात अव्वल दर्जाचा आणि लांब धाग्याचा कापूस पिकतो. तालुक्यातील जमीन अत्यंत सुपिक आहे. मात्र सिंचनाची सुविधा तोकडी आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपले हिरवे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य नाही. तालुक्यात तब्बल ८३ टक्के शेती कोरडवाहू आहे. त्यात केवळ एकच पीक घेतले जाते. ओलिताची सोय नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. त्यामुळे ८३ टक्के शेतकरी अद्याप निसर्गाच्या भरवशावरच अवलंबून आहेत. त्यांना कोरडवाहू शेती कसावी लागत आहे.वणी तालुक्यात उद्योगांची वानवा आहे. येथील एमआयडीसी परिसर भकास पडला आहे. मोजकेच उद्योग तेथे सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यातील ९० टक्के जनतेची उपजिवीका शेतीवरच अवलंबून आहे़ त्यात गेल्या २५ वर्षांत तालुक्यात कोळसा खाणी आल्या. त्यांनी हजारो हेक्टर शेती संपादित केली. परिणामी शेती क्षेत्रातही घट होत आहे. प्रत्यक्षात निसर्गान्े वणी तालुक्याला मुक्तहस्ताने संपन्न केले आहे. तालुक्याला पाण्याचे वरदान लाभले आहे. वर्धा व पैनगंगा या दोन मोठ्या याच तालुक्यातून वाहतात. याशिवाय निर्गुडा व विदर्भा या दोन प्रमुख लहान नद्याही तालुक्यात आहेत. तालुक्यात लहान-मोठेही नालेही अनेक आहेत. मात्र या मोठ्या नद्या, नाल्यांचे पाणी अद्याप शेतापर्यंत पोहोचलेच नाही. धरणे, बंधारे बांधण्यात आली नाहीत. परिणामी सर्व पाणी वाहून जात आहे. त्याचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना कवडीचाही लाभ मिळत नाही. त्यांना निसर्गाच्या पावसावरच अवलंबून राहावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून निसर्गही शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. एक वर्ष अतिव्ष्टी, तर दुसऱ्या वर्षी कोरडा दुष्काळ, असे दुष्टचक्र सुरू आहे.तालुक्यात ६५ हजार ५६२ हेक्टर शेती क्षेत्र आहे़ त्यापैकी केवळ ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे़ उर्वरित तब्बल ५४ हजार हेक्टर शेती कोरडवाहू आहे. यात काही शेतकऱ्यांनी ओलितासाठी शेतात बोअर व ट्युबवेल खोदले आहे. मात्र अनेकांना वेळेवर वीज जोडणी मिळत नाही. परिणामी शेतात पाणी असूनही त्यांना ओलीत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना वर्षातूक केवळ एकच पीक घेता येते. सिंचन सुविधा नसल्याने तालुक्यात दिवसेंदिवस उत्पन्नात घट होत आहे. दुसरीकडे खर्च मात्र वाढत आहे. बियाणे, खत, किटकनाशके खरेदी करताना शेतकरी भांबावून जात आहे. त्यामुळे त्यांचे अंदाजपत्रक कोलमडून पडत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)निर्गुडा नदीचे खोलीकरण, बंधारे बांधणारआता निर्गुडा नदीचे खोलीकरण करून त्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यासाठी नवीन सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आदींनी त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. तथापि यावर्षी आता उन्हाळा संपत आला आहे. पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे हे खोलीकरण पुढच्या वर्षांवर जाण्याचीच जादा शक्यता आहे. परिणामी बंधारेही यावर्षी पूर्णत्वास येणे अशक्य आहे. चार महिन्यांपूर्वीच त्या दृष्टीने सुरूवात करणे आवश्यक होते.बंधारे बांधण्याची गरजतालुक्यात काही वर्षांपूर्वी नदी व नाल्यांवर सहा कोल्हापुरी बंधारे बांधणात आले होते. त्यापैकी एकाही बंधाऱ्यात पाणी साठविले जात नाही़ परिणामी या बंधाऱ्यांवर करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला आहे. या बंधाऱ्यांचे बरगे तर कधीच चोरीस गेले आहे. शासन या कोल्हापुरी बंधाऱ्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ते आता निरूपयोगी ठरले आहेत.