शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शासनाने शब्द फिरविल्याने शेतकरी आत्महत्येत वाढ

By admin | Updated: December 13, 2014 22:47 IST

भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे.

यवतमाळ : भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेत असलेला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. मागील ७२ तासात दुष्काळग्रस्त भागात ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याला केवळ युती शासनाची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप विर्दभ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. भाजप -शिवसेनेच्या युती सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करणे व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. आता त्यांनी शब्द फिरविला असून तिजोरी खाली असल्यामुळे ते शक्य नाही असे सुतोवाच केले आहे. यामुळे विश्वासघाताच्या धक्याने शेतकरी आत्महत्या होत आहे. ज्या ११ शेतकऱ्यांनी मागील ७२ तासात आपली जीवनयात्रा संपविली त्यांची ओळख माध्यमांनी मोरेश्वर चौधरी रा. देहेली, सुरेश जाधव रा. साखरा, त्याताजी सोनुर्ले रा. नागरगाव, हंसराज भगत रा. घारफळ या यवतमाळ जिल्ह्यातील शेतऱ्यासोबतच कचरु तुपसुंदरे रा. रामपुर जिल्हा अमरावती ,नामदेव खंडारे रा. माथान, वामन राउत रा. चांडोले जिल्हा बुलडाणा, उमाशंकर काटकर रा. आजनी केशव चौधरी रा. बोरगाव नागपूर, पांडुरंग हिवसे रा. खराडी भंडारा, रेवनाथ भारसाकळे रा. नगरी गडचिरोली असून यावर्षी विदर्भात १ हजार ५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मस्तवाल अधिकारी शेतकऱ्यांच्या अडचणीची माहिती सरकारला देत नसल्यामुळे सरकार मदतीला विलंब करीत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला. शेतकरी आत्महत्या व समस्यांचा तोडगा सिंचन नसून मातीचा ओलावा असा जावईशोध अधिकाऱ्यांनी लावून नवीन सरकारला पटवून दिल्याने सरकारने शेतकऱ््यांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान, संपूर्ण कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करावी, शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी दिले नाही तसेच सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ दिले नाही. त्यामुळेच दिवसाला पाच शेतकरी आत्महत्या करीत आहेत असे किशोर तिवारी यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)