शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्थांच्या अधिकारावर गदा

By admin | Updated: June 29, 2017 00:16 IST

राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती हा संस्थाचा उत्पन्नाचा स्त्रोत होता.

भरतीवर शासनाचा वॉच : अभियोग्यता चाचणीद्वारे होणार शिक्षकांची भरती लोकमत न्यूज नेटवर्क वणी : राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती हा संस्थाचा उत्पन्नाचा स्त्रोत होता. त्यावरच शासनाने गदा आणल्याने खासगी शिक्षण संस्था खिळखिळ्या होण्याची वेळ आली आहे. शासन क्रमाक्रमाने शिक्षण संस्थाकडील अधिकार कमी करायला लागल्याने शिक्षण संस्थाचालकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. राज्यामध्ये खासगी शिक्षण संस्थांचे मोठे जाळे पसरले आहे. या शिक्षण संस्था माध्यमिक शाळा संहिता या अधिनियमानुसार चालविल्या जातात, तर शाळांमधील कर्मचाऱ्यांसाठी खासगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम १९८१ हा कर्मचाऱ्यांना सेवाशास्वती देतो. परंतु नजीकच्या काळात शासनाने या दोन्ही अधिनियमात मोठे बदल करून संस्थाचे अधिकार आपल्या हातात घेण्याचा घाट घातला आहे. शाळांमधील कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ काढण्याचे अधिकार शाळा समिती किंवा संस्थेच्या कार्यकारी मंडळाला होते. यावर्षी काही विभागाच्या शिक्षण उपसंचालकाने पत्र काढून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ काढण्यासाठी संस्थेच्या किंवा शाळा समितीच्या ठरावाची गरज नाही. मुख्याध्यापकांच्या प्रमाणपत्राच्या अधारावरच वेतनवाढ मंजुर करण्याच्या सूचना वेतनपथक कार्यालयांना दिल्या. बऱ्याच वर्षापासून थोडे फार अनुदान दिले जात आहे. मराठी शाळांतील पटसंख्या दरवर्षी कमी होत असल्याने चार वर्षापासून शिक्षक भरती बंद आहे. भविष्यात अनेक शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने शिक्षकांची भरती पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र शासनाने २३ जुनला एक शासन निर्णय काढून शिक्षक भरतीसाठी पवित्र ही संगणकीय प्रणाली सुरू केली अहे. खासगी संस्थामध्ये शिक्षक निवड आणि नियुक्ती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमीतता होत असल्याच्या तक्ररी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शिक्षक भरतीमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी व गुणवत्तेवर आधारीत निवड प्रक्रिया होण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यासाठी शिक्षकांची अभियोग्यता चाचणी होणार आहे. संस्थेमध्ये शिक्षकाचे पद रिक्त झाल्यास जाहिरात या प्रणालीवर प्रसिद्ध करावी लागेल. अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकाला त्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करता येईल. संस्थेला अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती करावयाची आहे. या शिक्षक भरती प्रक्रियेत राज्य शासनाचा किंवा संस्थेचा हस्तक्षेप राहणार नाही. जर संस्थेने अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून शिक्षक भरती केली नाही, तर शैैक्षणिक संस्थेला अनुदान अनुज्ञेय होणार नाही. उमेदवार जाहिरातीला अनुसरून आॅनलाईन अर्ज करतील. अर्ज आलेल्या उमेदवारांपैैकी उच्चतम गुण असणाऱ्या उमेदवाराला संस्था ई-मेलद्वारे निवडीचे पत्र पाठवतील. निवड झालेल्या शिक्षकाला १५ दिवसात संबंधित संस्थेत रूजू व्हावे लागेल. अभियोग्यता चाचणी आॅनलाईन होणार शिक्षकांची अभियोग्यता चाचणी विषय निहाय घेतली जाणार नाही. सदर परीक्षा आॅनलाईन व वस्तुनिष्ठ स्वरूपाची राहणार आहे. परीक्षेत मिळालेले गुण उमेदवारास परीक्षा संपल्यावर त्वरित कळेल. एक उमेदवार जास्तीत जास्त पाच वेळा चाचणी देऊ शकेल. सदर परीक्षा २०० गुणांची राहणार आहे. त्यामधील १२० गुण अभियोग्यता व ८० गुण बुद्धीमत्ता या घटकांवर राहिल. या घटकांमध्ये गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचुकता, भाषिक क्षमता, कला, आवड, व्यक्तीमत्व या उपघटकांचा समावेश असेल. उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी शाळा समिती करतील.