शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या,महागाई विरोधात वणी तहसीलवर धडकला मोर्चा

By admin | Updated: July 26, 2016 00:05 IST

महाराष्ट्र राज्य किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला.

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन : राज्य किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा सहभागवणी : महाराष्ट्र राज्य किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चा नेण्यात आला. २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार सत्येत येताच महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्याचे निवेदनात म्हटले आहे. पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, डाळ व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने जनता हवालदिल झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी युवकांना नोकऱ्या देण्याचे स्वप्न दाखविले होते. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही दिवसेंदिवस बेरोजगरांचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच शेतीमाल नियमनमुक्ती व कृषी उत्पन्न बाजार समितीच्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाची लूटमार सुरू असून त्यात सुधारणा करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. केंद्र शासनाने सन २००६ मध्ये वनाधिकार कायदा लागू करून त्याला १० वर्षे पूर्ण झाली. परंतु या कायद्याच्या नियमप्रमाणे अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे हजारो आदिवासी शेतकरी जीवनयात्रा संपविण्याच्या मानसिकतेत आहे. वन विभागाच्या हस्तक्षेपामुळे या कायद्याचे उल्लंघन होत असून कलमानुसार १३/०३ प्रमाणे सहा पुराव्यापैकी दोन पुरावे असणारे दावे पात्र करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, शेतीमाल नियमन मुक्ती व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात सुधारणा करण्यात यावी, महागाईवर नियंत्रण आणण्यात यावे, वनाधिकार कायद्यानुसार अपात्र ठरलेल्या दाव्यांची फेरचौकशी करून दावे मंजूर करावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देताना शंकर दानव, कुमार मोहरमपूरी, के.पी.सरकार, चंद्रशेखर सिडाम, राम जिड्डेवार, कवडू चांदेकरसह किसान सभा व माकपचे पदाधिकारी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)