शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

पिण्याचे पाणी वळविले शेतीसाठी

By admin | Updated: May 11, 2017 01:10 IST

तालुक्यातील तापमान सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे.

पाणीटंचाईचे संकेत : पूस धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : तालुक्यातील तापमान सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच पुसद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुसद शहरावर पाणीटंचाईची टांगती तलवार असतानाच पूस धरणातून उन्हाळी भूईमूगासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे पुसदवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला. परिणामी पूस धरण पूर्णपणे भरले होते. परंतु या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याने धरण १०० टक्के भरले असतानाही पाणीसाठा हा केवळ ७० टक्केच असतो. ३० टक्केहून अधिक जागा गाळाने व्यापलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र या प्रकल्पावर कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या पाण्याचा उपसा करण्यात येतो. या प्रकल्पातून उन्हाळी भूईमूगासाठी पाणी सोडल्या जात असताना संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी या पाण्याचा वापर कशासाठी होतो, पाणी वाहून तर जात नाही ना, याची साधी चौकशीही करीत नाही. केवळ कागदी घोडे नाचविली जात आहे. सध्या पुसद शहराला नियमित एक तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही भागात तो जास्तही केला जातो. कोणतेही नियोजन नसतानाही नगरपरिषद प्रशासन मूग गिळून बसले आहे. ज्या भागात केवळ एक तास पाणी मिळतो तो भाग कमी दाबाचा असल्याने अनेकांचे पाणीच होत नाही. त्यामुळे अनेकांना आताच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शहराला योग्य व नियमित पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. तसेच वाया जाणारे व शेतीला वापर होणारे पाणी थांबविणे आवश्यक आहे. पूस धरणात २० एप्रिल रोजी २६ टक्के जलसाठा होता. ५ मे रोजी २० टक्के तर १० मे रोजी केवळ १४.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा साठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या शहराचे तापमान ४३ अंशांच्या वर गेले असून पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यातच प्रशासन भूईमुगाला पाणी सोडत असल्याने हजारो लिटर पाणी वापरण्याऐवजी नाल्यात वाहून जात आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. आजही कॅनॉलमध्ये पाणी सोडल्या जात आहे. पाण्याची नासाडी थांबवून योग्य नियोजन न केल्यास पुसदकरांना पाणीटंचाईची झळ बसल्याशिवाय राहणार नाही. पुसद नगर परिषदेचे नियोजनच नाही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणातील पाणीसाठा सध्या अत्यल्प आहे. अशातच याच धरणातील पाणी शेतीसाठी अनेकजण वापरत आहे. परंतु अशावेळी नगर परिषद मात्र मूग गिळून बसल्याचे दिसून येत आहे. नगर परिषदेकडून आगामी पाणीटंचाई लक्षात घेता कोणतेही नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.