शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 7, 2014 23:47 IST

हमखास पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा झाली. लांबलेल्या पावसाने जिल्हा कोरड्या दुुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

चारा महागला : चार लाख हेक्टरची स्थिती हाताबाहेरयवतमाळ : हमखास पाऊस बरसणारा भाग म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदा निसर्गाची अवकृपा झाली. लांबलेल्या पावसाने जिल्हा कोरड्या दुुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पेरणी झालेल्या चार लाख हेक्टरची स्थिती हाताबाहेर गेली असून चाराही महागला आहे.जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिमी आहे. गतवर्षी ११०० मिमी पाऊस कोसळला. यावर्षी एक महिन्यात केवळ वार्षिक सरासरीच्या ७ टक्के पाऊस कोसळला. या अत्यल्प पावसाने खरीपाच्या पेरण्या उलटल्या आहेत. मुंबईत मान्सुन दाखल होताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. जिल्ह्यात सध्यास्थितीत तीन लाख ८६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र पाऊस लांबल्याने पेरण्या उलटल्या आहे.उपाययोजना हव्यातजिल्ह्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या स्थितीतून सावरण्यासाठी ठोस उपाय योजनांची गरज आहे. त्यावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अवलंबून राहणार आहे. वैरण महागले जिल्ह्याच्या जनावरांच्या वैरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना ५ रूपयाची वैरणाची पेंढी २० रूपयात खरेदी करावी लागत आहे. चारा टंचाईच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी चाराडेपो उघडण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासनाने अद्यापही प्रस्ताव सादर केला नाही. यातून शेतकरी संकटात आहे.जिल्ह्यावर ओढवलेले संकट भीषण असून आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनाही त्याचे चटके बसल्याशिवाय राहणार नाही. यासाठी शासनाने आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे.गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण भागातील पशुपालकांची पशुंच्या चाऱ्यासाठी भटकंती सुरू आहे. पशुंचा पाण्याचाही प्रश्न आहे. यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने चारा डेपो सुरू करण्याची वारंवार मागणी पशुपालकांमधून करण्यात आली. परंतु या मागणीकडे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दुर्लक्ष केले. त्यातच आता पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पशुंची नियमित तपासणी व लसीकरणसुद्धा रखडले आहे. एकीकडे शेती उद्ध्वस्त होत असताना आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा असलेल्या पशुपालनावरही मोठे संकट उभे ठाकले आहेत.प्रशासन मात्र या सर्व संकटांकडे दुर्लक्ष करीत आहे. शासकीय अधिकारी-कर्मचारीसुद्धा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून या परिस्थितीचा फायदा आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी करीत असल्याचा आरोप ग्रामीण भागातून होत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची साथ दिली नाही. मागील वर्षीचा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातातून गेला. त्यानंतर गारपिटीमुळे रबीसुद्धा साथ देवू शकला नाही. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी होते नव्हते ते सोने विकून आता नव्याने खरिपाची तयारी केली होती. यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.दुबार पेरणीसाठी शासनाचे अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणतेही नियोजन दिसून येत नाही. कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँका तयार नाही. या सर्व परिस्थितीची झळ शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना बसणार आहे. महागाईचा जोर आताच वाढला आहे. (शहर वार्ताहर)