शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:54 IST

पाण्याच्या शोधात तालुक्यातील नरसापूर शिवारातील महादेव मंदिराच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचण्यिात बचाव पथक अपयशी ठरले. पथक उशिरा पोहचणे, एकमेकांत ताळमेळ नसणे, योग्य साधने व तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे बिबट्याला वाचविता आले नाही, असा उपस्थितांचा सूर होता.

ठळक मुद्देनरसापूरची घटना : जीव वाचविण्यात वनखात्याला अपयश

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पाण्याच्या शोधात तालुक्यातील नरसापूर शिवारातील महादेव मंदिराच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचण्यिात बचाव पथक अपयशी ठरले. पथक उशिरा पोहचणे, एकमेकांत ताळमेळ नसणे, योग्य साधने व तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे बिबट्याला वाचविता आले नाही, असा उपस्थितांचा सूर होता.मृत बिबट हा नर होता. त्याचे वय अंदाजे एक वर्षाच्या आसपास होते. शनिवारी सकाळी श्रमदानासाठी जंगलात गेलेल्या नागरिकांना हा बिबट विहिरीत पडून असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बचाव पथक तब्बल तीन तासाने उशिरा पोहोचले. तत्पूर्वी वनविभागाचे चार डझनाच्यावर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र बिबटाला बाहेर काढण्यासाठी त्यांच्याजवळ कुठलेही साधन नव्हते. बचाव पथकाचे प्रमुखही घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा त्यांच्याजवळही कोणतेच साधन नव्हते. यानंतर वनविभागाचे बचाव पथक सर्व साधने घेऊन तेथे पोहोचले. तथापि एका लाकडाच्या आधारावर जिवंत असणारा बिबट बचाव पथकाचे आॅपरेशन सुरु झाल्यानंतर काही क्षणातच गटांगळ्या खाऊ लागला आणि अवघ्या पाच मिनिटातच तो पाण्याच्या तळाशी गेला. नंतर त्याला बाहेर काढून पंपींग करुन वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरला.तीव्र पाणीटंचाईमुळे जंनलातील वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. सदर बिबटही पाण्याच्या शोधातच विहिरीत पडला होता. यावेळी सहायक वनसंरक्षक आर.व्ही.गोपाल, उपविभागीय वन अधिकारी बी.पी.राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी सी.एस.गावंडे, मोबाईल स्कॉडचे वनपरिक्षेत्र अधिकारी नाल्हे, नितीन वानखडे, ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे यांच्या नेतृत्वात वन व पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता.चुकीच्या प्रयत्नामुळे मृत्यूहा बिबट एका लाकडी फाट्याच्या आधारावर विहिरीत तग धरून होता. विहीर केवळ १२ ते १४ फूट खोल होती. त्यामुळे विहिरीत शिडी अथवा एखादे झाड तोडून टाकल्यास बिबट त्याच्या आधारे बाहेर येऊ शकतो, अशी माहिती गावकरी वनविभागच्या रेस्क्यू टिमला देत होत. मात्र रेस्क्यू टिम लाकडाचा झुला करुन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होती. शेवटी रेस्क्यू आॅपरेशन चुकीच्या पद्धतीने झाल्याने व गावकऱ्यांचे म्हणणे न ऐकल्याने बिबटाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी स्थानिकांचा सल्ला मानला असता तर ही वेळ निश्चितच आली नसती. परंतु आपलीच ‘गिनो’ म्हणणाऱ्या एका अतिउत्साही अधिकाऱ्यामुळे बिबटाला जीव गमवावा लागला. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :leopardबिबट्या