शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्यावर दुष्काळाची सावली

By admin | Updated: July 9, 2014 23:54 IST

संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे २० लाख हेक्टरवरील पेरणी पूर्णत: मोडकळीस आली आहे. दुबार पेरणीची वेळही निघून जात असून विदर्भ व मराठवाड्यावर दुष्काळाची भीषण सावली आहे.

यवतमाळ : संपूर्ण राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे २० लाख हेक्टरवरील पेरणी पूर्णत: मोडकळीस आली आहे. दुबार पेरणीची वेळही निघून जात असून विदर्भ व मराठवाड्यावर दुष्काळाची भीषण सावली आहे. या गंभीर बाबीची केंद्र व राज्य सरकारने दखल न घेतल्यामुळे दुष्काळाचा फटका बसलेल्या यवतमाळ जिल्ह्यात १२ जुलै रोजी विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात पांढरकवडा येथे उपोषण सत्याग्रह करण्यात येणार आहे.जून महिन्यात ७, ११, १७ व २४ तारखेला पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेली कापूस व सोयाबीनची पेरणी पावसाने दडी मारल्यामुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. लगतच्या तेलंगणा राज्याप्रमाणे राज्य सरकार तत्काळ मदत जाहीर करणार, ही अपेक्षा आता फोल ठरली असून शेतकरी मात्र हतबल झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भ व मराठवाडा दुष्काळाचा सामना करत असून पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.खरिपाच्या पेरणीसाठी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून व्यवस्था केली होती. त्यानंतर दुबार पेरणीसाठी घरचे सोनेसुद्धा गहाण ठेवून पीककर्ज काढावे लागले. तेसुद्धा वाया गेले आहे. लगतच्या तेलंगणा सरकारने तत्काळ हेक्टरी दहा हजार रुपये मदत, सोने गहाण ठेवून घेतलेले कर्ज माफ केले. महाराष्ट्र सरकारने कुठलेच पाऊल उचलले नाही. या संदर्भात विदर्भ जनआंदोलन समितीने राज्य व केंद्र सरकारला २० जूनला निवेदन पाठवून शेतकऱ्यांना बियाणे व नव्याने कर्ज द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र अजूनपर्यंत शासनाने कुठलेच पाऊल उचलले नाही. विशेष म्हणजे अधिकारीवर्ग शासनाची दिशाभूल करीत असून पेरणी झाली नाही अथवा फार कमी झाली, अशी माहिती सरकारला देत आहे. सहकारी व सरकारी बँकांनी फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. आता सावकार व कृषी केंद्र चालकही शेतकऱ्यांना उधार बियाणे देण्यास तयार नसून लोकप्रतिनिधी मात्र या बाबत उदासीन असल्याचा आरोपही किशोर तिवारी यांनी पत्रकातून केला आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला शासनाने धावून यावे, अशी मागणी तिवारी यांनी केली असून १२ जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)